पुणे | प्रतिनिधी
पुणे, दि.१५ : पुणे शहरातील प्रवाशांची संख्या वाढत आहे. प्रवाशांच्या संख्येसोबतच बस मार्गांचा विस्तार करून नवीन बसेस सुरू करण्याची मागणीही पुणेकरांकडून करण्यात आली होती. त्याचप्रमाणे पुणे महानगर परिवहन महामंडळातर्फे (पीएमपीएमएल) आणखी दोन नवीन बस मार्गांचे उद्घाटन करण्यात आले आहे.
पीएमपीएमएल तर्फे चर्होली गाव ते वाकडेवाडी (रूट क्र. 119A) आणि नीलज्योती सोसायटी ते स्वारगेट (रूट क्र. 89) या दोन बहुप्रतीक्षित मार्गांचे उद्घाटन करण्यात आले आहे. यावेळी शिवाजीनगर मतदारसंघाचे आमदार सिद्धार्थ शिरोळे यांनी बसला हिरवी झेंडा दाखवला आहे.
या उद्घाटनप्रसंगी पीएमपीएमएलचे अधिकारीही मोठ्या संख्येने उपस्थित होते. या निर्णयामुळे संबंधित भागातील नागरिकांचा प्रवास अधिक सुलभ झाला आहे. प्रवाशांनी चर्होली गाव ते वाकडेवाडी आणि नीलज्योती सोसायटी ते स्वारगेट या बसचा लाभ घ्यावा, असे आवाहन पीएमपीएमएलने केले आहे.












