पुणे | प्रतिनिधी
पुणे, दि.१५ : पुणे शहरात किरकोळ कारणावरून भांडण करत जिवे मारण्याची घटना उघडकीस आली आहे.ही घटना लष्कर पोलिस स्टेशन च्या हद्दीत घडली आहे.
सलीम शेख ( रा. टॉवर कॅम्प पुणे ) यांनी एका अनोळखी इसमाविरुद्ध फिर्याद दाखल केली आहे.
फिर्यादी हे त्यांच्या घरी जाण्यासाठी त्यांच्या गाडीवरून निघाले होते. एक इसम रस्त्यावर फटाके फोडत होता.तेव्हा फिर्यादी यांनी त्यांच्या गाडीचा हॉर्न वाजवला.आरोपी याने फिर्यादीने हॉर्न वाजवल्याचा राग मनात ठेवत तू हॉर्न क्यों बजाता हैं, तेरेको बहोत मस्ती चढी हैं क्या,मैं तेरेको उपर पोहोचाता हु असे बोलत जिवे मारण्याची धमकी दिली.तसेच फिर्यादी यांच्या छातीवर डाव्या बाजूस धारदार शस्त्राने वार करून त्यांना गंभीर जखमी केले.
आरोपीवर भादवी कलम ३०७,५०४,५०६ अंतर्गत गुन्हा नोंदविण्यात आला असून अद्याप आरोपीला अटक करण्यात आले नाही.पुढील तपास पोलीस उप निरीक्षक अक्षय गायकवाड हे करत आहेत.












