पुणे । प्रतिनिधी
पुणे दि. १४ : पुणे येथील बीटी कवडे रोडवर काही दिवसांपूर्वी एका सराफावर गोळीबार करून फरार झालेल्या सहा आरोपींना पुणे शहर पोलिसांनी दिल्लीतून अटक केली आहे. तिन्ही आरोपींना आज कोर्टात हजर केले असता त्यांना आठ दिवसांची पोलिस कोठडी सुनावण्यात आली आहे.
आरोपी हल्ला करून दिल्ली येथे पळून गेले होते. परंतु, पुणे पोलिसांनी मोठ्या शिताफीने त्यांना अटक केली आहे. वानवडी पोलिस स्टेशनच्या पथकाने देशाच्या राजधानीतून तीन आरोपींना अटक केली. ज्यात शूटर बिलाल अहमद असदली त्यागी (वय ३४), हनी वाल्मिकी (वय २६) आणि सागर राज कुमार (वय २३, सर्व दिल्लीचे रहिवासी) यांचा समावेश आहे. यापैकी त्यागीने सराफावर हल्ला गोळी झाडली होती.
सराफ मदनलाल ओसवाल (वय 71, रा. बीटी कवाडे रोड) आणि त्यांचा मुलगा प्रतीक ओसवाल (वय 35) यांचे हडपसर येथे सोन्याच्या दागिन्यांचे दुकान आहे. दिनांक ८ नोव्हेंबर रोजी रात्री दुकान बंद करून ते घरी परतत असताना बी.टी.कवडे रोडवरील जयसिंग ससाणे गार्डन जवळ त्यांच्यावर हल्ला करण्यात आला. त्यांच्याकडे असलेल्या बॅगेत रोख रक्कम दहा हजार आणि दोन तोळ्याचे दागिने हिसकवण्याच्या प्रयत्न दरोडेखोरांनी केला असता प्रतिक याने त्यांना विरोध केला.
यावेळी आरोपी त्यागी याने प्रतिकच्या दोन्ही पायावर आणि गालावर गावठी पिस्टलने गोळ्या झाडल्या. यामध्ये प्रतीक गंभीर जखमी झाला. या घटनेची माहिती मिळताच वानवडी पोलिस ठाण्याचे पथक घटनास्थळी दाखल झाले आणि प्रतीकला तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले. त्यांच्यावर इनामदार हॉस्पिटलमध्ये उपचार सुरू आहेत, याप्रकरणी प्रतीकचे वडील मदनलाल ओसवाल यांनी एफ.आय.आर. दाखल केली आहे.
पोलिसांनी तीन अज्ञात व्यक्तींवर कलम ३४,३४ व ३९७;आणि शस्त्रास्त्र कायद्या अधिनियमच्या कलमांखाली गुन्हा दाखल केला आहे.
तपासादरम्यान, पोलिसांनी गुन्ह्याच्या ठिकाणी असलेले अनेक सीसीटीव्ही कॅमेऱ्यांचे फुटेज आणि हल्लेखोरांनी पळून जाण्यासाठी वापरलेला मार्ग तपासला. तपासानुसार हल्लेखोरांनी पुण्यात एक खोली भाड्याने घेतली होती. तपासाच्या आधारे, वानवडी पोलिसांच्या पथकाने दिल्लीतील आरके पुरम परिसरातून इतर तीन आरोपींना अटक केली आहे.












