पुण्यातील उत्तम नगर भागात हातात कोयते आणि बंदुक घेऊन काही गुंडांनी दहशत माजवत वाईन्स शॉप वर दरोडा घातला आहे. पोलीस स्टेशन पासून हाकेच्या अंतरावर हा धक्कादायक प्रकार घडला आहे. त्याचप्रमाणे मागील काही महिन्यात पुण्यामध्ये खुनाचे प्रकार देखील वाढले आहे, त्यामुळे पुण्यात कायदा सुव्यवस्थेचे तीन तेरा वाजतानाचा चित्र दिसत आहेत.
दरोड्याच्या प्रकरणी उत्तम नगर पोलीस ठाण्यात सहा जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला असून २४ तासानंतरही या गुंडांना पडकण्यात पोलिसांना अपयश आले आहे. याबद्दल अधिक माहिती अशी की, उत्तम नगर भागात हातात कोयते आणि बंदुक घेऊन काही गुंडांनी दहशत माजवली.
त्यानंतर या गुंडानी कोयता आणि बंदुकीचा धाक दाखवत आर आर वाइन्स दुकानातून जवळपास 3 लाख रुपयांची रोकड आणि दारूच्या बाटल्या चोरून नेल्या. या ठिकाणचे सी.सी.टि.व्ही. कॅमेरा फुटेज पोलिसांना प्राप्त झाले आहे त्या प्रमाणे सहा जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला असून ते सध्या फरार आहेत.












