मागील काही दिवसांपासून भारतासह अन्य काही देशांमध्ये भूकंपाचे सत्र सुरू झाल्याचे सत्र आहे. भारत, चीन, नेपाळ, बांग्लादेश, पाकिस्तान, अफगाणिस्तान या देशांत मोठे भूकंप झाले त्यानंतर आता पुन्हा एकदा भारताला भूकंपाचा धक्का बसला आहे.
आज पहाटेच्या सुमारास लडाखमधील लेहमध्ये भूकंपाचे धक्के जाणवले. नॅशनल सेंटर फॉर सिस्मोलॉजीने दिलेल्या माहितीनुसार लेह आणि लडाखमध्ये मंगळवारी पहाटे साडेचार वाजण्याच्या सुमारास भूकंप झाला.
रिश्टर स्केलवर या भूकंपाची तीव्रता ४.५ इतकी नोंदविण्यात आली. जमिनीपासून पाच किलोमीटर खोल या भूकंपाचा केंद्रबिंदू होता. या भूकंपात कुणाचाही मृत्यू झाल्याची माहिती अद्याप मिळालेली नाही.












