गुरुवारी पुणे शहरात बकरी ईद साजरी होणार आहे. त्या निमीत्त मुस्लीम बांधव एकत्र येऊन आप-आपल्या मोहल्यातील मशिद व ईदगाह मैदानावर / सार्वजनिक ठिकाणी सामूहीक नमाज पठण करून ईद साजरी करतात. त्यामध्ये ईदगाह मैदान, गोळीबार चौक परिसरात मोठया प्रमाणावर वाहनांची गर्दी होते, सदर ठिकाणी वाहतुक सुरळीत ठेवण्यासाठी तात्पुरत्या स्वरुपात वाहतुक वळविण्यात आले आहे.
गोळीबार मैदान चौक पुणे येथील ईदगाह या ठिकाणी दिनांक २९/०६/२०२३ रोजी सकाळी ०६.०० वा. पासून नमाज पठण पुर्ण होई पर्यंत मम्मादेवी चौक ते गोळीबार मैदान चौक ते ढोले पाटील ( सेव्हन लव्हज) चौक दरम्यान सर्व प्रकारच्या वाहनांची वाहतुक आवश्यकते नुसार बंद करण्यात येणार आहे. नमूद रस्त्यावरील वाहन चालकांनी खालील प्रमाणे पर्यायी मार्गाचा येणे-जाणेसाठी वापर करावा.
गोळीबार चौकातून स्वारगेटकडे जाणारा मार्ग हा गोळीबार चौकातून डाव्या बाजूस वळून सीडीओ चौक पुढे नमाज पठणाच्या वेळी बंद करण्यात येईल. सीडीओ चौक ते गोळीबार चौकाकडे येणारी वाहतुक नमाज पठण काळात सकाळी ०६.०० ते ११.०० वा. चे वेळेत पुर्णता बंद करण्यात येईल. प्रवासी उजवीकडे वळून गिरीधर भवन चौक पुढे उजवीकडे वळून सेव्हन लव्हज चौकातून इच्छित स्थळी जातील. लुल्लानगरकडून येवून खाण्या मारुती चौकाकडे जाणारी वाहतुक खटाव बंगला चौक – नेपीयर रोड-मम्मादेवी चौक बिशप स्कुल मार्गे किंवा वानवडी बाजार चौक भैरोबानाला येथुन किंवा गिरीधर भवन चौकातून इच्छित स्थळी जातील. सेव्हन लव्हज चौका कडून गोळीबार मैदानकडे सॅल्सबरी पार्क सीडीओ चौक – भैरोबानाला येथून इच्छित स्थळी येणारी वाहतुक बंद करण्यात येईल.सोलापूर रोडने मम्मादेवी चौकातुन चौकाकडे जाणारा मार्ग बंद करण्यात येईल. भैरोबानाला ते गोळीबारकडे जाणारी वाहतुक भैरोबानाला येथे बंद करुन एम्प्रेस गार्डन व लुल्लानगरकडे वळविण्यात येईल. कोंढवा परीसरातून गोळीबार कडे येणा-या सर्व जड माल वाहतुक वाहने, प्रवासी वाहतुक करणारी जड वाहने, एसटी बसेस, पीएमपीएमएल बसेस यांनी यांना मनाई करण्यात येत आहे. मम्मादेवी चौक बिशप स्कुल मार्गे किंवा जुने कमांड हॉस्पीटल मार्गे इच्छितस्थळी जातील. प्रिन्स ऑफ वेल रोडने (एम्प्रेस गार्डन रोड) किंवा भैरोबानाला- वानवडी बाजार – लुल्लानगर येथून इच्छित स्थळी जातील. सदर वाहनांनी पर्यायी मार्गाचा वापर करून लुल्लानगर चौकातून भैरोबानाला चौकामार्गे किंवा गंगाधाम चौकातून इच्छित स्थळी जातील.
याखेरीज शहरातील अन्य भागातील ठिकाणचे ईदगाह मैदानावर नमाज पठण होत असते, सदर भागातील वाहतूकीचे परिस्थितीनुसार तेथील वाहतूक बंद अथवा अन्य मार्गाने वळविण्यात येईल, तरी वाहन चालकांनी पोलीसांना सहकार्य करून संभाव्य गैरसोय टाळावी असे आव्हान करण्यात आले आहे.
बकरी ईदच्या पार्शवभूमीवर गोळीबार चौकातील वाहतूक व्यवस्थेतेत बदल












