लोकसभा निवडणुकीची लगबग सुरू झाली आहे. राजकीय मैदानातील लढतीसाठी योग्य उमेदवाराची चाचपणी पक्षाकडून केली जात आहे. अजित पवार यांचे कट्टर समर्थक असलेले मा.महापौर, मा.शहराध्यक्ष राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी पिंपरी चिंचवड शहर (जिल्हा) संजोग वाघेरे यांनी उद्धव ठाकरे यांच्या पक्षात जाण्याचा निर्धार पक्का केला आहे. तसेच त्यांनी राष्ट्रवादीचे श्रीरंग बारणे असो वा पार्थ पवार यापैकी कोणालाही चितपट करणारच असा विश्वासही त्यांनी दर्शविला आहे.
संजोग वाघेरे यांनी दोन वेळा लोकसभा निवडणुकीची तयारी करून देखील राष्ट्रवादीकडून उमेदवारी न मिळाल्याने ठाकरे यांची भेट घेत उमेदवारीची मागणी केली होती. त्यावर ठाकरेंनी दोन दिवसांचा वेळ मागितला होता. त्यानंतर आता ते थेट ठाकरे गटामध्ये प्रवेश करणार आहेत. वाघेरे हे अजित पवार यांचे कट्टर समर्थक आणि पिंपरी चिंचवड मधील राष्ट्रवादीचे मोठे नेते मानले जातात. तसेच ते मा.महापौर,मा.शहराध्यक्ष राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी पिंपरी चिंचवड शहर (जिल्हा) देखील होते. तर त्यांचे वडील देखील राष्ट्रवादीत होते. त्यांनी शरद पवारांना खंबीर साथ दिली. पवार घराण्यावर त्यांचं विशेष प्रेम आहे
.मावळमधून उमेदवारी मिळण्याची शक्यता धूसर दिसू लागताच त्यांनी शिवसेनेच्या ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांची भेट घेतली. तर आता येत्या 30 डिसेंबरला म्हणजे शनिवारी संजोग वाघेरे यांचा शिवसेनेच्या ठाकरे गटांमध्ये प्रवेश होण्याची शक्यता आहे. यामुळे पिंपरी चिंचवड शहरातील राजकारणात एकच खळबळ उडाली आहे.












