पुणे : पुण्यातील सातारा रस्त्यावरील काका हलवाई इंडस्ट्रियल इस्टेट मध्ये स्पिन्स सोर्स नावाच्या बोगस कंपनी मधून हजारो तरुणांची नोकरीच्या आमिषाने फसवणूक होत असल्याची तक्रार भारतीय जनता पार्टीच्या महिला पदाधिकारी सौ शैलजा पाठक यांच्याकडे आली असता.
घटनेची चौकशी करून त्या ठिकाणी गेल्यावर जवळपास 25 तरुणांची फसवणूक झाल्याचे उघडकीस आले त्यानंतर श्रीमती पाठक यांनी पुणे शहराचे भारतीय जनता पार्टीचे प्रसिद्धी सहप्रमुख पुष्कर तुळजापूरकर व महिला आघाडी सरचिटणीस प्रियांका शेंडगे यांच्याशी संपर्क करून सदर प्रकरणाविषयी माहिती दिली त्यानंतर तुळजापूरकर व शेंडगे यांनी पर्वती पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक श्री नंदकुमार गायकवाड यांच्याशी संपर्क साधून सदर कंपनीच्या कार्यालयात छापा मारण्याची विनंती केली सदर ठिकाणी पोलीस पोचले असता.
अनेक तरुणांची व तरुणांची फसवणूक झाल्याचे लक्षात आले त्यानुसार पोलिसांनी मौलिक राजा नामक व्यक्तीला ताब्यात घेऊन त्याकडे चौकशी चालू केली आहे सदर घटनेची फिर्याद ही या ठिकाणी दाखल होत असून लवकरच ती आपणाकडे प्राप्त होईल












