भारत आणि इंग्लंड यांच्यात दुसरा कसोटी सामना विशाखापट्टणम मध्ये खेळला जात आहे. या सामन्याच्या दुसऱ्या डावात भारताचा स्टार फलंदाज शुभमन गिलने शतक झळकावले आहे. पहिल्या कसोटी सामन्यात भारताला पराभवाचा सामना करावा लागला होता, त्यामुळे हा सामना भारतासाठी खूप महत्त्वाचा आहे.
पण दुसऱ्या सामन्यात चौथ्या दिवसाचा खेळ संपण्यापूर्वीच भारतीय क्रिकेट संघाला मोठा धक्का बसला आहे. सामन्याच्या तिसऱ्या दिवशी शतक झळकावणाऱ्या शुभमन गिलला दुखापत झाली आहे. विशाखापट्टणम कसोटीच्या चौथ्या दिवशीचा खेळ सुरू होण्यापूर्वीच शुबमन गिल दिवसाच्या खेळात क्षेत्ररक्षण करू शकणार नाही, अशी माहिती बीसीसीआयने दिली.
सामन्याच्या तिसऱ्या दिवशी भारतीय संघ 255 धावांवर बाद झाला आणि इंग्लंडला 399 धावांची मोठी धावसंख्या मिळाली. सामन्याच्या तिसऱ्या दिवशी भारताकडून शतक झळकावणारा शुभमन गिल चौथ्या दिवसाच्या खेळात मैदानात उतरला नाही. त्याच्यासाठी, बीसीसीआयने सोशल मीडियावर अधिकृत निवेदन जारी केले की, दुसऱ्या दिवसाच्या खेळात त्याच्या बोटाला दुखापत झाली होती आणि त्यामुळे तो चौथ्या दिवशी क्षेत्ररक्षण करू शकणार नाही.












