मनोरंजन क्षेत्रातून अत्यंत धक्कादायक बातमी समोर आली आहे. आपल्या बोल्ड वक्तव्याने कामय चर्चेत राहणारी मॉडेल आणि अभिनेत्री पूनम पांडेचं निधन झाल्याचं समोर आले आहे.या संदर्भात तिच्या इन्स्टाग्राम अकांऊट वर एक पोस्ट करण्यात आली आहे. ही पोस्ट सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.त्यानुसार, पूनमचं निधन गर्भाशयाच्या मुखाच्या कर्करोगामुळे झालं आहे.पूनम पांडेची ही पोस्ट पाहून चाहत्यांना ती आता आपल्यात नाही यावर विश्वास बसत नाहीये.
पांडेच्या इन्स्टाग्राम अकाउंटवर शेअर केलेल्या पोस्टमध्ये असे लिहिले आहे की, “आजची सकाळ आमच्यासाठी कठीण आहे. आपणास कळविण्यास अत्यंत दु:ख होत आहे की, गर्भाशयाच्या मुखाच्या कर्करोगामुळे आपण आपली लाडकी पूनम गमावली आहे. त्यांच्या संपर्कात आलेली प्रत्येक व्यक्ती त्यांना प्रेमाने भेटली. या दुःखाच्या वेळी, आम्ही गोपनीयतेची विनंती करू. आम्ही शेअर केलेल्या प्रत्येक गोष्टीसाठी आम्ही त्याची आठवण ठेवू.
पांडेच्या मृत्यूच्या वृत्ताला तिच्या पीआर टीमने एबीपी न्यूजला दुजोरा दिला आहे. ही इन्स्टा पोस्ट चार दिवसांची असली तरी. अभिनेत्रीच्या निधनाच्या वृत्तानंतर चाहत्यांना मोठा धक्का बसला असून ते सोशल मीडियावर पोस्ट करून आपले दुःख व्यक्त करत आहेत.












