मराठा आरक्षणाचा मुद्दा आता पुन्हा एकदा तापला आहे. जरांगेनी सरकारला अल्टिमेट दिला तरी काही झाले नाही यातच आता मराठा आरक्षणासाठी लातूर येथील मांजरा आयुर्वेदिक महाविद्यालयाच्या वसतीगृहात एका विद्यार्थ्याने गळफास घेऊन आत्महत्या केलीय. प्रदीप निवृत्ती मते पाटील असे या विद्यार्थ्यांच नाव असून तो बीएएमएस च्या प्रथम वर्गात शिक्षण घेत होता.बीड जिल्ह्यातील लोणी येथील तो रहिवासी होता.
आज सकाळी सात वाजता त्याने गळफास घेऊन आत्महत्या केली. आत्महत्येपूर्वी रात्री मराठा आरक्षण राजकारण यावर त्याने मित्रांशी चर्चा केली. तसेच कुटुंबीयांना फोन करून बोलला. सकाळी त्याने मराठा समाजाला आरक्षण मिळावे यासाठी मोबाबाईलवर स्टेस्टस ठेवले तसेच मराठा आरक्षण # अशी चिठ्ठी लिहून ठेवली. रूम मित्राला सांगितले तू बाहेर बस तुला लाईटचा त्रास होईल मी अभ्यास करणार आहे. मित्र बाहेर जाताच त्याने दरवाजा आतून लाऊन घेतला आणि गळफास घेऊन आत्महत्या केली.
प्रदीपचा मृतदेह शवविच्छेदनासाठी स्व. विलासराव देशमुख शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात नेला आहे. या प्रकरणी गांधी चौक पोलीस ठाण्यात नोंद करण्यात आली असून पोलीस अधिक तपास करत आहेत.












