पुणे:मनोज जरांगे यांना मुंबईत येण्यापासून रोखण्याकरिता गुणरत्न सदावर्ते यांनी केलेल्या याचिकेवर मुंबई उच्च न्यायालयात न्यायमूर्ती अजय गडकरी व न्यायमूर्ती श्याम चांडक यांच्या खंडपीठासमोर सुनावणी झाली.
गुणरत्ने सदावर्ते यांनी स्वत: युक्तिवाद केला तर राज्य सरकारकडून महाधिवक्ता वीरेंद्र सराफ यांनी बाजू मांडली.
मनोज जरांगे पाटली यांना मुंबईत येऊ देऊ नये. अन्यथा मुंबई विस्कळीत होईल आणि जनजीवन ठप्प होईल. अशी विनंती गुणरत्न सदावर्ते यांनी स्वत: युक्तिवाद मांडत मुंबई उच्च न्यायालयाला केली होती. राज्य सरकारतर्फे महाधिवक्ता यांनीही मुंबईत प्रचंड प्रमाणात गर्दी आल्यास शहर ठप्प होईल, अशी भीती व्यक्त करत मुंबईबाहेर आंदोलन होणे योग्य ठरेल असे म्हणणे कोर्टात मांडले.
दरम्यान, महाधिवक्ता सराफ यांनी आंदोलनाविषयीचे सर्वोच्च न्यायालयाच्या निकालाचे विविध दाखले दिले. दोन्ही बाजूंचा युक्तिवाद एकून अखेर मुंबई उच्च न्यायालयाने मनोज जरांगे यांच्या आंदोलनाला कोणतीही आठकाठी न घातल्याने मराठा समाजाचा मुंबईतील आंदोलनाचा मार्ग मोकळा झाला आहे.












