महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या आदेशानुसार तसेच अमित ठाकरे अध्यक्ष महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेना यांच्या उपस्थितीत महाराष्ट्र राज्य प्रदेश अध्यक्ष महाराष्ट्र नवनिर्माण माथाडी कामगार सेना सचिन गोळे यांच्या मार्गदर्शनाखाली महाराष्ट्र राज्य उपाध्यक्षपदी श्री संजय सोमाजी देवकर यांची निवड करण्यात आली.
यापुर्वी श्री संजय सोमाजी देवकर यांनी महाराष्ट्र नवनिर्माण माथाडी कामगार सेना अध्यक्ष मुळशी तालुका पद देण्यात आले होते. त्यांच्या कामाची दखल घेत त्यांना महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष सचिन गोळे यांच्या मार्गदर्शनाखाली पद देण्यात आले.
यावेळी पुणे शहर अध्यक्ष साईनाथ बाबर तसेच पुणे जिल्हाध्यक्ष संतोष आप्पा दसवडकर मुळशी तालुका महाराष्ट्र नवनिर्माण सेना, तालुका अध्यक्ष धनंजय टेमघीरे, उपाध्यक्ष गणेश शिंदे , तालुकाध्यक्ष गणेश जोरी तसेच अध्यक्ष विद्यार्थी सेना मुळशी तालुका अनिल मातेरे, महेश राजीवडे, श्रीकांत मातेरे, निखील गुडंगळ, विशाल वाल, रोहीत माने, अजय ढवळे उपस्थित होते












