मराठा समाजाला आरक्षण भेटावे यासाठी मराठा आंदोलक नेते मनोज जरांगे पाटील यांच्या नेतृत्वात अंतरवली सराटी येथून मुंबईच्या दिशेने मोर्चा निघाला या मध्ये लाखोंच्या संख्येने मराठा बांधव या मोर्चामध्ये सहभागी झाले.वाशी मध्ये सरकारने मराठा आंदोलकांच्या सर्व मागण्या मान्य केल्या. यात मराठा समाजाच्या आंदोलनाला यश आले असे म्हणावे लागेल त्यानंतर मराठा समाजाने जल्लोष केला. याच मोर्चामध्ये आष्टी येथील जोगेश्वरी, पारगाव,येथील तरुण सहभागी झाले होते. मराठा समाजाला आरक्षण मिळाल्या नंतर हे तरुण पुन्हा आपल्या गावी परतले तेव्हा त्यांच्या गावातील ग्रामस्थांकडून त्यांचे मोठ्या जल्लोषात स्वागत केले.
या आंदोलनात सागर भोराडे, हौसराव भोसले, सचिन कदम, खंडू कदम, शिवाजी कदम, अशोक कल्याण कदम, अशोक नामदेव कदम, ज्ञानदेव सुरवशे, बाळासाहेब सुरवशे, दत्तात्रय अण्णा भोसले, अशोक टकले, गोविंद भोसले, हनुमंत सतीश बळे, दीपक भोराडे, छत्रगुण भोराडे, सौरभ भोराडे, वैभव भोराडे, सचिन भोराडे, अंगद भोराडे,भागवत भोराडे, दत्तात्रय रोडे. या तरुणांनी सहभाग घेतला होता त्यानंतर त्यांच्या गावी विजयाचा गुलाल उधळला.












