पुणे: महापालिकेच्या अग्निशमन दलात प्रथमच एका फायरवूमनची नियुक्ती करण्यात आली आहे. मेघना महेंद्र सपकाळ असे या मुलीचे नाव असून तिचे आजोबा आणि वडीलही अग्निशमन दलाशी संबंधित आहेत. मेघनाचे वडील महेंद्र सकपाळ हे अग्निशमन दलात कार्यरत आहेत. तिचे आजोबा सदाशिव बापूराव सपकाळ अग्निशमन दलातून सेवानिवृत्त झाले आहेत. अग्निशमन दलात सेवेची परंपरा तिच्या कुटुंबात आहे.
आजोबा आणि वडिलांना लहानपणापासून बघत आल्याने या क्षेत्राची आवड निर्माण झाली. माझं स्वप्न पूर्ण झालं. माझ्यासोबत माझ्या वडिलांचं आणि आजोबांचं स्वप्न पूर्ण झालं. अग्निशमन दलात मुलींनाही येणं शक्य आहे असं तिनं सांगितलं.पुणे महापालिकेच्या अग्निशमन दलाच्या जवान भरतीत एकूण १६७ उमेदवारांची नुकतीच निवड झाली. त्यात मेघना महेंद्र सपकाळ हिचीही फायरवूमन म्हणून निवड झाली आहे.
मी आज खुप खुश आहे. मी पुणे अग्निशमन दलात जवान म्हणून निवड होणारी पहिली मुलगी आहे. माझे आजोबा येथूनच सेवानिवृत्त झाले व माझे वडिल आता फायरमन आहेत. माझ्या बाबांसोबत काम करण्याचा आनंद मिळेल, अशी प्रतिक्रिया मेघना हीने दिली.












