भांडण ही प्रत्येकामध्ये होत असतात.त्यासाठी प्रत्येकजण त्याचा बदला घेण्यासाठी वेगवेगळा मार्ग अवलंबतात.अशाच एका मोकाच्या गुन्हयात एक वर्षापासुन फरारी असलेल्या सराईत गुन्हेगारास सहकारनगर पोलीसांनी शिताफीने अटक केली आहे.
दि.०३/०५/२०२२ रोजी रात्री २१/३० वाजायच्या सुमारास ( साई चौक,साधु भेळवाल्याचे दुकानासमोर,तळजाई वसाहत,पद्मावती,पुणे ) येथे जुन्या भांडणाचे कारणावरून एक अल्पवयीन मुलगा ( वय १७ वर्षे, रा. गल्ली नं. ११ तळजाई वसाहत,पद्मावती,पुणे )यास पुणे रेकॉर्डवरील गुन्हेगार नामे सोनु घडे, मंगेश मिसे प्रेम चांदणे, नागेश शिंदे व त्यांचे इतर साथीदारांनी शिवीगाळ करून धारदार हत्यारांनी वार केला.तसेच त्यांना जिवे ठार मारण्याच्या प्रयत्न केला. तेथील नागरीकांना हत्यारे दाखवुन दहशत निर्माण केली.
दाखल गुन्हयाचा तपास मा. सहा. पोलीस आयुक्त स्वारगेट विभाग पुणे श्री. नारायण शिरगावकर, वरिष्ठ पोलीस निरीक्षक सहकारनगर पोलीस स्टेशन पुणे श्री. सावळाराम साळगांवकर यांचे मार्गदर्शनाखाली तपास पथकाचे सहा पोलीस निरीक्षक समीर शेडे व तपास पथकाचे स्टाफने सुरु केला. दाखल गुन्हयात यापुर्वी सोनु घडे नागेश शिंदे प्रेम चांदणे व इतर आरोपींना वेळोवेळी अटक करण्यात आली आहे. गुन्हा दाखल झाल्यानंतर यातील सराईत गुन्हेगार मंगेश ऊर्फ मंगल बाबासाहेब भिसे वय २२ वर्षे रा. तळजाई वसाहत पुणे हा पळुन गेले होता.
त्याचा बातमीचे आधारे शोध घेत असताना दि.०५/०६/२०२३ रोजी सहा. पोलीस निरीक्षक समीर शेंडे, पो. ना. ६७८५ फरांदे व पो.शि.८४३५ मंडलीक यांना बातमी मिळाली की आरोपी नामे मंगेश ऊर्फ मंगल बाबासाहेब भिसे हा त्याचे आई वडीलांना भेटण्यासाठी संभाजीनगर धनकवडी येथील विठ्ठल मंदीराजवळ येणार आहे. लागलीच सदर भागात सापळा लावुन त्यास ताब्यात घेवुन सहकारनगर पोलीस स्टेशन येथे आणुन दाखल गुन्हयात अटक केली आहे.
सदरचा आरोपी हा पुणे पोलीस आयुक्तालयाचे रेकॉर्डवरील गुन्हेगार असुन त्यांचेवर शरीराविरुध्दचे अनेक गुन्हे दाखल आहेत. तो गुन्हा दाखल झाल्यापासुन जळगाव, सोलापुर भागात लपुन राहत असल्याचे तपासात निष्पन्न झाले आहे.
फिर्यादी यांनी दिलेल्या फिर्यादी वरुन सहकारनगर पोलीस स्टेशन येथे गु.र.नं. ९८/२०२२ भा. दं. विकलम ३०७, १४३, १४४, १४७, १४८, १४९, ३२३, ५०४, ५०६, ३४ आर्म अॅक्ट (४) २५, महाराष्ट्र पोलीस कायदा कलम ३७ (१) (३) सह १३५ क्रिमीनल लॉ अॅमेंडमेंट कायदा कलम ७ प्रमाणे गुन्हा नोंद आहे. दाखल गुन्हयाचा तपास चालू असताना वरील आरोपीविरुद्ध दाखल गुन्हयात मोका कलमांचा अंतर्भाव करण्यात आला आहे..
सदरची कामगीरी मा. अपर पोलीस आयुक्त पश्चिम प्रादेशीक विभाग श्री प्रविणकुमार पाटील, मा. पोलीस उपायुक्त परिमंडळ- २, श्रीमती स्मार्तना पाटील, मा. सहा. पोलीस आयुक्त, स्वारगेट: विभाग श्री. नारायण शिरगावकर, वरिष्ठ पोलीस निरीक्षक सावळाराम साळगांवकर, पोलीस निरीक्षक (गुन्हे) सहकारनगर पोलीस स्टेशन मनोज शेडगे यांचे मार्गदर्शनाखाली सहकारनगर पोलीस स्टेशन तपास पथकाचे सहा. पोलीस निरीक्षक समीर शेंडे, सह तपासी अधिकारी मोहसीन पठाण, पोलीस अंमलदार बापु खुटवड, भुजंग इंगळे, सुशांत फरांदे, बजरंग पवार, महेश मंडलिक, नवनाथ शिंदे, सागर सुतकर, सागर कुंभार, विशाल वाघ, खंडु शिंदे, महिला पोलीस अंमलदार आरती शिंदे यांनी केली आहे.












