आगीच्या घटना या उन्हाळ्यात घडत असतात. उष्ण तापमान मुळे इलेक्ट्रिकल शॉर्ट सर्किटचे प्रमाण सर्वाधिक बघायला मिळते. अशीच एक घटना लोहगाव परिसरातील ब्रह्मा स्काय सिटी इमारती मध्ये घडली.
. या इमारतीमध्ये नवव्या मजल्यावरील एका फ्लॅट ला आग लागली. तेथील नागरिकांना हे कळतात त्यांनी अग्निशामक दल ला संपर्क करून हे कळवले. अग्निशामक दलातील जवान तत्पर्तने तेथे पोहोचवून ही आग आटोक्यात आणली. अग्निशामक दलातील जवानांनी सांगितले प्रथमदर्शनी ही आग इलेक्ट्रिकल शॉर्ट सर्किटमुळे लागली असावी ही आग लागली होती त्यावेळेस कोणीही त्या फ्लॅटमध्ये उपस्थित नव्हते त्यामुळे कोणतीही जीवितहानी झाली नाही.या आगीमुळे फ्लॅट मधील फर्निचर चे टीव्ही चे एसीचे सर्व वस्तू जळून खाक झाले आहेत.
ॲम्बुलन्स चा आवाज ऐकल्यावर जसे लोक सामाजिक जबाबदारी म्हणून ॲम्बुलन्स साठी जागा देतात. सामाजिक जबाबदारी म्हणून अग्निशामक दलाच्या गाडीला सुद्धा लोकांनी सहकार्य केलं पाहिजे. आज आम्ही जेव्हा गाडी घेऊन इमारती जवळ पोहोचत होतो तेव्हा रोड वरती लोक अग्निशामक दलाची गाडी बघत उभे होते पण त्यांची गाडी बाजूला लवकर काढत नव्हते. – अग्निशामक दल वाहन चालक












