पुणे प्रतिनिधी
पुणे दि.२९ : मोक्याच्या गुन्ह्यात फरार असलेल्या आरोपीला आठ महिन्या नंतर अटक करण्यात आले आहे. ही कामगिरी सिंहगड पोलिसांनी केली आहे. आकाश सुभाष गाडे (रा. रामनगर , सिंहगड रोड) असे आरोपीचे नाव आहे.
सदर आरोपी हा ,स्वामी नारायण मंदिराजवळ न-हे येथे थांबला असल्याची माहिती पोलीस अंमलदार देवा चव्हाण व सागर शेडगे यांना मिळाली. त्या अनुषंगाने पोलिसांनी सापळा रचून आरोपीला ताब्यात घेण्यात आले आहे. आरोपी गेल्या आठ महिन्यान पासून फरार होता. आरोपीने गुन्ह्याची कबुली दिली आहे.
सदरची कामगिरी पोलिस आयुक्त परि-3 सुहेल शर्मा, सह पोलीस आयुक्त राजेंद्र गलांडे यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलीस निरीक्षक अभय महाजन, पोलीस निरीक्षक जयंत राजुरकर, सह पोलीस निरीक्षक सचिन निकम, गणेश मोकाशी, पोलीस उपनिरीक्षक आबा उत्तेकर, अंमलदार संजय शिंदे विकास पांडुळे, विकास बांदल, देवा चव्हाण, सागर शेळके, शिवाजी शिरसागर,राहुल ओलेकर, स्वप्निल मगर, दक्ष पाटील, अमोल पाटील, राजू वेंगरे, अविनाश कोंडे यांनी केले आहे.












