पुणे प्रतिनिधी
पुणे दि.८ : बस मधून मोबाईल चोरी करणाऱ्या परराजीय टोळीला पोलिसांनी अटक केले आहे. या प्रकरणी चौघांना अटक करण्यात आली असून पोलीस तपासात चार गुन्हे उघडकीस आले आहे. फिर्यादी व त्यांचे चुलत भाऊ हे दि.५ रोजी अलंकार चौकातून पीएमपीएल बसमध्ये चढत असताना चार अज्ञात चोरट्याने किशातून दहा हजार रुपये किंमतीचा मोबाईल चोरून फरार झाले होते. या प्रकरणी फिर्यादी कडून बंडगार्डन पोलीसात तक्रार देण्यात आली होती.
सतीश व्यंकटेश माधागोलू (वय २२ रा. हैद्राबाद, तेलंगणा),जगदीश भास्करराव आवला (वय २२ रा. पाथीपुराम,आंध्रप्रदेश),विक्रम शिवनाथ दास (वय २२ रा.हैद्राबाद, तेलंगणा),गणेश कृष्ण गोड (वय २२ रा. जि. महासमुंड,छत्तीसगड) असे आरोपींचे नावे आहे. आरोपींकडून दोन लाख रुपये किंमतीचे बारा मोबाईल फोन जप्त करण्यात आले आहे.
सदर आरोपी हे पुणे एस टी स्टॅन्ड समोर, अंडाभुर्जीच्या हातगाडी जवळ थांबून मोबाईल विक्री संदर्भात विचारणा करत असल्याची माहिती पोलीस अंमलदार मनोज भोकरे,शिवाजी सरक यांना गुप्त माहिती मिळाली.
त्या अनुषंगाने पोलिसांनी सदर आरोपीला ताब्यात घेतले आहे. आरोपी विरोधात भा.द.वि कलम ३७९,३४ अंतर्गत बंडगार्डन पोलीस स्थानकात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
सदरची कारवाई अपर पोलीस आयुक्त प्रवीण कुमार पाटील,पोलीस उप आयुक्त परि-२ स्मार्तना पाटील, सह पोलीस आयुक्त आर.एन.राजे, वरिष्ठ पोलीस निरीक्षक संतोष पाटील, पोलीस निरीक्षक अश्विनी सातपुते, यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक रवींद्र गावडे, मोहन काळे, अनिल कुसाळकर, संजय वनवे,मनोज भोकरे, शिवाजी सरक, तुळशीराम खडे यांच्या पथकाने केले आहे.
मोबाईल चोरणाऱ्या परराजीय टोळीला पोलिसांकडून दणका












