पुणे : महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे १ ते २६ मार्च या कालावधीत होणार आहेत परीक्षेसाठी १६ लाख ९ हजार ४४५ विद्यार्थांनी नोंदनी केली आहे. ही परीक्षा सुरक्षित वातावरणात होण्यासाठीच्या उपाययोजना राज्य मंडळाने केल्या असून २७२ भरारी पथके नेमण्यात आली आहे. निवडणूक आचारंहिता लागली तरी परीक्षेवर फारसा परिणाम होणार नाही. राज्य मंडळाचे अध्यक्ष शरद गोसावी यांनी पञकार परिषदेत ही माहिती दिली. मंडळाच्या सचिव अनुराधा ओक. माणिक बांगर या वेळी उपस्थित होते. परीक्षेच्या कालावधीत विद्यार्थांच्या समुपदेशनासाठी राज्य मंडळ स्तरावर दहा समुपदेशकांची नियुक्ती केली आहे.
उत्तरपञिकेची गोपनीयता राहण्यासाठी सहायक परिरक्षक बैठ पथक म्हणून परीक्षा केंद्रावर कार्यरत राहणार आहे. तसेच प्रश्रपञिकांची गोपनीय पाकिटे ताब्यात घेतल्यापासून वितरीत करेपर्यंतचे चिञीकरण करण्यात येणार आहे. सहायक परीरक्षक यांनी त्यांच्या मोबाइलचे जीपीएस सुरू ठेवणे आवश्यक आहे.
परीक्षेच्या वेळेनंतर दहा मिनिटे वाढवून देण्यात आली आहेत. यंदा सहा हजार खासगी आणि आठ हजार पुनर्परीक्षार्थी वाढले आहेत. असे गोसावी यांनी सांगितले. लोकसभा निवडणूक असली,तरी निकाल वेळेत जाहीर केला जाईल असे गोसावी यांनी स्पष्ट केले आहे.












