लक्षद्वीप : भारतातील अनेक लोकांना लक्षद्वीप हा भारतात भाग आहे. हे आता कळले देशाचे पंतप्रधान लक्षद्वीप बेटा वरती नुकतेच गेले होतो. मोदींच्या लक्षद्वीप या दौऱ्याची खूप चर्चा आहे. या दौऱ्यावर मोदींनी त्यांचे काही फोटो सोशल मीडिया वरती टाकले लोकांचा एक भाग म्हणू लागला की आता सुट्टीसाठी मालदीवऐवजी लक्षद्वीपला जा.अशा ट्विटला उत्तर देताना मालदीव सरकारच्या मंत्र्यांनी लक्षद्वीपशी मालदीवची तुलना करणे योग्य नाही, असे आक्षेपार्ह शब्द वापरले. त्यानंतर लक्षद्वीपशी मालदीव हा वाद सुरु झाला. मालदीव सरकारने तीन मंत्री पदावरून बरखास्त केले. भारतातील अनेक दिग्ग्ज लक्षद्वीपसाठी मैदानात उतरले भारतासाठी लक्षद्वीप एवढा महत्वाचा का ?आहे कसा बनला भारताचा भाग.

ऑगस्ट 1947 मध्ये जेव्हा भारत आणि पाकिस्तानची फाळणी झाली. भारताचे गृहमंत्री आणि उपपंतप्रधान सरदार वल्लभभाई पटेल यांनी 500 हून अधिक संस्थानांना एकत्र करण्यात महत्त्वाची भूमिका बजावली. पाकिस्तानचे तत्कालीन पंतप्रधान लियाकत अली खान यांनी पंजाब, सिंध, बंगाल आणि हजारा यांना पाकिस्तानात विलीन करण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न केले. पण लक्षद्वीपकडे कोणी लक्ष दिले नाही. स्वातंत्र्यानंतर लक्षद्वीप भारत किंवा पाकिस्तान यांच्या अखत्यारीत नव्हते. कारण दोघेही मुख्य भूमीतील देशांना स्वतःशी जोडण्याचा प्रयत्न करत होते. ऑगस्टच्या अखेरीस पाकिस्तानच्या लियाकत अली खान यांनी विचार केला की लक्षद्वीप हा मुस्लीम बहुल भाग आहे. आणि भारताने त्यावर अद्याप दावाही केलेला नाही, मग त्यावर ताबा का घेऊ नये.इतिहासकार म्हणतात की त्याच वेळी भारताचे गृहमंत्री सरदार वल्लभभाई पटेल हे देखील लक्षद्वीपबद्दल विचार करत होते. मात्र, तेथे अद्याप कोणी दावा केला आहे. की नाही, याबाबत दोन्ही देश थोडे संभ्रमात होते. या गोंधळातच पाकिस्तानने आपली एक युद्धनौका लक्षद्वीपला पाठवली. दुसरीकडे सरदार पटेल यांनी आर्कोट रामास्वामी मुदलियार आणि अर्कोट लक्ष्मणस्वामी मुदलियार यांना सैन्यासह ताबडतोब लक्षद्वीपकडे जाण्यास सांगितले.

सरदार पटेल यांनी लक्षद्वीप लवकरात लवकर काबीज करून लक्षद्वीपमध्ये भारतीय राष्ट्रध्वज फडकवावा, असे निर्देश दिले. दुसरीकडे पाकिस्तानी लष्करही मार्गावर होते. अखेर भारतीय सैन्य प्रथम लक्षद्वीपमध्ये पोहोचले आणि तिरंगा फडकवण्यात आला. काही वेळाने पाकिस्तानची युद्धनौकाही तेथे पोहोचली. मात्र भारताचा तिरंगा ध्वज पाहून ते शांतपणे परतले. तेव्हापासून लक्षद्वीप हा भारताचा अविभाज्य भाग आहे. आमच्या सैन्याला अर्धा तास उशीर झाला असता तर आजची परिस्थिती वेगळी असती.

लक्षद्वीप भारतासाठी महत्त्वाचे का आहे?
भारताच्या सुरक्षेच्या दृष्टीकोनातून लक्षद्वीप अत्यंत महत्त्वाचे मानले जाते. युनायटेड नेशन्स लॉ ऑफ द सी कन्व्हेन्शन्सनुसार, कोणत्याही देशाचे किनारपट्टीपासून 22 किमीपर्यंतचे क्षेत्र त्या देशाच्या अधिकारक्षेत्रात येते. त्यामुळे भारताला २० हजार चौरस किलोमीटरपर्यंतच्या समुद्रात अधिक प्रवेश मिळतो. येथून हिंदी महासागर आणि अरबी समुद्र या दोन्हींवर लक्ष ठेवता येते. लष्करी आणि व्यवसायाच्या दृष्टीनेही याला खूप महत्त्व आहे.












