ललित पाटील ड्रग्स प्रकरणात ससून रुग्णालयातील कर्मचाऱ्याला गजाआड केल्यानंतर आणखी एका वैद्यकिय अधिकाऱ्याला पोलिसांनी बेड्या ठोकल्या आहेत.ससून रुग्णालयाचे वैद्यकिय अधिकारी डॉ. प्रविण देवकाते यांना पोलिसांनी अटक केली आहे.
ललित पाटीलला मदत केली म्हणून या अधिकाऱ्याला आधी निलंबित करण्यात आलं होतं. त्यानंतर काल या अधिकाऱ्याला अटक करण्यात आली. ललित पाटील याला रुग्णालयातून पळून जाण्यास मदत केल्याचाही आरोप या अधिकाऱ्यावर आहे.
ललित पाटील हा डॉ. देवकाते यांच्या निगराणीखाली रुग्णालयात उपचार घेत होता. काल रात्री उशिरा पुणे पोलिसांनी त्यांना अटक केली. देवकाते रुग्णालयात ऑर्थोपेडिक सर्जन म्हणून कार्यरत होते. डॉ. देवकाते यांनी ललित पाटीलचा रुग्णालयातील मुक्काम वाढवला होता, अशीही माहिती आता समोर येत आहे. डॉ. देवकाते हा ललित पाटीलचा भाऊ आणि आणखी एका साथीदाराच्या संपर्कात होता.












