पुणे प्रतिनिधी
पुणे, दि. २३ : मराठी शादी डॉट कॉम या मॅट्रिमोनियल साईट वरून एका महिलाची प्रोफाइल पाहून त्यातून तिचा मोबाईल नंबर घेऊन आकाश शंकर जगदाळे वय 32 राहणार तळेगाव या इसमाने त्या महिलेसोबत ओळख वाढवली व तिला लग्नाचे आमिष दाखवत तिची इच्छा नसताना सुद्धा तिला स्वतः च्या टाटा सफारी या गाडी मध्ये तळेगाव, ताथवडे, पुणे येथील वेगेगळ्या ठिकाणच्या लॉज मध्ये नेऊन जानेवारी २०२२ ते दि. १७/०६/२०२३ या काळात तिच्या सोबत वारंवार शारीरिक संबंध केले.
यासंदर्भात एका २१ वर्षीय महिलेने वाकड पोलीस स्टेशन मध्ये दि. २२ रोजी तक्रार दाखल केल्यानंतर हा प्रकार उघडकीस आला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार आरोपी आकाश जगदाळे याने वारंवार शारीरिक संबंध करत ति गरोदर राहिल्यावर तिला ‘ तु अबॉर्शन केला तरच मी तुझ्याशी लग्न करेल नाहीतर मी तुझ्यासोबत लग्न करणार नाही’ अशी धमकी देत त्या महिलेच्या मनाविरुद्ध जबरदस्तीने ॲबोर्शन करण्यास भाग पाडले मात्र ॲबोर्शन नंतर महिलेने आकाश याला लग्नाबाबत विचारले असता त्याने लग्नास नकार देत शिवीगाळ करत त्याच्या मोबाईल मध्ये फिर्यादी महिले सोबत शारीरिक संबंध करतानाचे व्हिडिओ दाखवत ‘ मी आपले शारीरिक संबंध करतानाचे व्हिडिओ काढले आहे तू जर मला त्रास दिला तर मी हे व्हिडिओ व्हायरल करेल’ अशी धमकी दिली.
पीडित महिलेच्या तक्रारीनंतर वाकड पोलीसांनी आकाश जगदाळे विरोधात भा.दं. वी. कलम ३७६,३७६(२)(एन), ३१३,५०४,५०६ प्रमाणे गुन्हा दाखल केला आहे












