शिरगाव : विज्ञान आश्रम पाबळ संस्थेच्या वतीने कोथरूड येथील जे पी नाईक सेंटर मध्ये घेण्यात आलेल्या राज्यस्तरीय टेक्नोव्हेशन प्रकल्प स्पर्धेत शिरगाव (ता. मावळ) येथील आमदार प्रकाश देवळे माध्यमिक विद्यालयाच्या आय बी टी विभागाच्या इयत्ता ९ वी च्या विद्यार्थ्यांनी बटरी व सोलारवर चालणारा मिक्सर या प्रकल्पाने प्रथम क्रमांक पटकावला. सदर पारितोषिक या स्पर्धेत महाराष्ट्रातील विविध जिल्ह्यातून ४० शाळांनी सहभागी होत ४३ प्रकल्प सदर केले होते.
ग्रामीण भागातील समस्या शोधून त्यावर उपाय म्हणून प्रकल्पाची निवड करण्यात यावी असे संस्थेच्या वतीने सांगण्यात आले होते.. शिरगाव येथील शारदाश्रम आश्रम शाळेत १५० विद्यार्थ्यांचा स्वयंपाक बनविण्यासाठी लाईट गेल्यावर मिक्सरवर वाटण वाटण्यासाठी वीज येईपर्यंत तासन तास वाट पहावी लागत असे किंवा पाटा व वरवंटा यावर वाटण वाटावे लागत असे ही समस्या विद्यार्थ्यांनी लक्षात घेवून बटरी व सौर उर्जा यांचा वापर करून मिक्सर बनविण्याचे विद्यार्थ्यांनी ठरविले. यासाठी गणेश अंबेनगरे व ओमकार झांबरे या विद्यार्थ्यांनी टाकावू वस्तू वापरून कल्पकतेने मिक्सर बनविण्यास सुरुवात केली. एक महिन्याच्या अथक परिश्रमा अंती अत्यंत कमी खर्चात मिक्सर बनविण्यास त्यांना यश आले. हा मिक्सर बनविण्यासाठी आय बी टी विभागाचे निदेशक शिक्षक महेश निषाद व अथर्व नाईकनवरे यांचे मार्गदर्शन लाभले.
गणेश व ओमकार यांनी मिळविलेल्या यशाबद्दल संस्थेचे अध्यक्ष माजी आमदार प्रकाश देवळे, सचिव सपना लालचंदानी, कार्याध्यक्ष रवी जाधव, प्राचार्य रमेश फरताडे, शारदाश्रम चे मुख्याध्यापक विजय लोखंडे, वर्गशिक्षक किरण धादवड, डॉ. हनुमान सुरनर, रामभाऊ घुगे, बद्रीनारायण लेंडगुळे, संतोष चव्हाण, मच्छिंद्र कापरे, विनायक गायकवाड, राधेश्याम वारे, धनंजय नाईकवाडे, लक्ष्मीकांत ठाकुरद्वारे, अमित वावरे आदींनी अभिनंदन केले.












