पुणे शहर पोलीस दलातील दहा पोलीस निरीक्षकांच्या अंतर्गत बदली करण्याचे आदेश पोलीस आयुक्त रितेश कुमार यांनी दिले. पोलीस निरीक्षकांच्या प्रशासकीय कारणास्तव बदल्या करण्यात आल्या आहेत. अंतर्गत बदली झालेल्या पोलीस निरीक्षकांचे नाव आणि बदलीचे ठिकाण पुढीलप्रमाणे –
पोलीस निरीक्षक रजनीश सिरील निर्मल (गुन्हे शाखा युनिट ६ ते आर्थिक गुन्हे शाखा,
पोलीस निरीक्षक उल्हास गुलाबराव कदम (वाहतूक शाखा ते गुन्हे शाखा युनिट ६),
पोलीस निरीक्षक विक्रम रामसिंग गौड (गुन्हे, शिवाजीनगर पोलीस ठाणे ते वाहतूक शाखा, पोलीस निरीक्षक संजय नागोराव मोगले (गुन्हे, कोंढवा पोलीस ठाणे ते वाहतूक शाखा), पोलीस निरीक्षक रवींद्र मानसिंग कदम (नियंत्रण कक्ष ते गुन्हे शिवाजीनगर पाेलीस ठाणे), पोलीस निरीक्षक सोमनाथ दत्तात्रय जाधव (गुन्हे, स्वारगेट पोलीस ठाणे ते गुन्हे शाखा,युनिट, पोलीस निरीक्षक संगीता तुळशिदास पाटील (गुन्हे अलंकार पोलीस ठाणे ते गुन्हे शाखा स्वारगेट पोलीस ठाणे) पोलीस निरीक्षक गणेश जगन्नाथ माने (गुन्हे शाखा, युनिट ४ ते आर्थिक गुन्हे शाखा), पोलीस निरीक्षक मानसिंग संभाजी पाटील (गुन्हे, खडकी पोलीस ठाणे ते गुन्हे कोंढवा पोलीस ठाणे),पोलीस निरीक्षक सुरेखा मोतीराम चव्हाण (नियंत्रण कक्ष ते गुन्हे अलंकार पोलीस ठाणे) अशा बदल्या करण्यात आलेल्या आहेत.












