पद्मविभूषण माजी केंद्रीय कृषिमंत्री श्री शरद पवार साहेब यांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने दिनांक 12 व 13 डिसेंबर 2023 रोजी या शाखेत विज्ञान चित्रकला व रांगोळी प्रदर्शन आयोजित करण्यात आले होते या प्रदर्शनात इयत्ता पहिली ते इयत्ता बारावीच्या विद्यार्थ्यांनी सहभाग नोंदवला. विज्ञान प्रकल्पामध्ये 378 विद्यार्थी चित्रकला स्पर्धेमध्ये 600 विद्यार्थी रांगोळी स्पर्धेत 280 विद्यार्थी व विद्यार्थिनी यांनी सहभाग नोंदवला होता.
दोन दिवस प्रदर्शन पाहण्यासाठी पालक व विद्यार्थ्यांनी गर्दी केली होती. प्रदर्शनाचे उद्घाटनासाठी माजी नगरसेवक श्री धनंजय आल्हाट, माजी नगरसेविका श्रीमती मंदाताई आल्हाट, राष्ट्रवादी पिंपरी चिंचवड महिला आघाडीच्या श्रीमती कविताताई आल्हाट उपस्थित होते.
प्रदर्शनाच्या समारोपासाठी पिंपरी चिंचवड राष्ट्रवादीचे उपाध्यक्ष श्री अतिश शेठ बारणे, स्थायी समितीचे माजी अध्यक्ष श्री आप्पासाहेब बागल उपस्थित होते. उपस्थित सर्व मान्यवरांचे स्वागत प्राचार्य श्री आप्पासाहेब कळमकर, उपप्राचार्य श्रीमती गडहिरे, व प्राथमिकच्या मुख्याध्यापिका श्रीमती गवारे यांनी केले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक श्री झांजरे यांनी केले. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी विद्यालयातील अध्यापक अध्यापिका यांनी परिश्रम घेतले.
समारोप समारंभात यशस्वी विद्यार्थ्यांना पारितोषिक वितरण करण्यात आले. पारितोषिके श्री अतिश बारणे यांच्या हस्ते देण्यात आली.कार्यक्रमाचे सूत्रसंचालन श्री वाजे यांनी केले. कार्यक्रमाचे नियोजन सांस्कृतिक विभागाचे श्री सदाकाळ, श्रीमती बहिरवाडे व दरंदले यांनी केले होते.












