काँग्रेस नेते, आमदार सुनील केदार यांच्या अडचणी वाढल्या आहेत. नागपूर जिल्हा आणि सत्र न्यायालयाने जिल्हा बँकेतील 150 कोटी रुपयांच्या घोटाळ्यात केदार यांच्यासह सहा जणांना पाच वर्षांची तुरुंगवासाची शिक्षा सुनाविण्यात आली आहे. तर प्रत्येकी साडेबारा लाखांचा दंडही ठोठाविला आहे.
अतिरिक्त मुख्य न्याय दंडाधिकारी ज्योती पेखले-पूरकर यांनी हा निकाल दिला आहे. 2002 मध्ये केदार बँकेचे अध्यक्ष असताना 150 कोटींहून अधिक रुपयांचा घोटाळा झाल्याचा आरोप करण्यात आला होता. त्यानंतर या प्रकरणात गुन्हे दाखल होऊन तपास सुरु झाला होता. आता या प्रकरणात सुनील केदार, केतन शेठ, बँकेचे तत्कालिन मॅनेजर अशोक चौधरी यांच्यासह आणखी तीन जणांना दोषी ठरवून शिक्षा झाली आहे. त्यामुळे आता सुनील केदार यांची आमदारकी धोक्यात असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात सुरू आहे.












