सोबत चोरी करण्यास नकार दिला म्हणून महिलेला मारहाण करत तिचे दात पाडल्याचा धक्कादायक प्रकार पिंपरी येथे घडला आहे. याप्रकरणी पिंपरा पोलिसांनी आरोपीला अटक केली आहे.
सुभाष उर्फ चेंड्या मनोज टाक (वय ४५ रा. पिंपरी) असे अटक आरोपीचे नाव आहे. याप्रकरणी महिलेने पिंपरी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी यांना आरोपीने त्याच्याबरोबर चोरी करण्यासाठी सोबत चलण्यास सांगितले. त्याला फिर्यादीने नकार दिला. त्यानंतर आरोपीने फिर्यादीकडे पैशांची मागणी केली त्यालाही फिर्यादीने नकार दिला.
याचा राग येवून आरोपीने फिर्यादीला शिवीगाळ करत तोडांवर मुक्का मारला यात फिर्यादीचे चार दात पडले तसेच हात पिरगळून हात देखील फ्रॅक्चर केला. यावरून पिंपरी पोलिसांनी आरोपीला अटक केली असून पिंपरी पोलीस पुढील तपास करत आहेत.












