दि. २ फेब्रुवारी ते ४ फेब्रुवारी, समर्थ रामदास स्वामी क्रीडासंकुल, शेगाव, बुलढाणा राज्यस्तरीय ऐरोबिक जिम्नास्टीक स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे.या स्पर्धेच्या अनुशंगाने दि. १९ जानेवारी रोजी हेवन जिमनॅस्टिक अकादमी, रहाटणी येथे खेळाडूंनचे सादरीकरण व शुभेच्छा देण्यासाठी च्या कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता.या कार्यक्रमाचे अध्यक्ष पद पिंपरी चिंचवड मराठी पत्रकार परिषदचे अध्यक्ष श्री. अनिल वडघुले यांनी भूषविले. तसेच या कार्यक्रमात प्रमुख पाहुणे मराठी पत्रकार परिषदेच्या पुणे विभागीय सचिव श्री.गणेश मोकाशी आणि माजी नगरसेवक श्री.विनोद तापकीर हे उपस्थिती होते.
अनिल वडघुले यांनी पूर्वी खेळातले प्रकार व आजच्या खेळातल्या प्रकारांनमधले बदल दर्शविले.काळानुसार बदल अपेक्षीत आहे याची जाणीव करून दिली. गणेश मोकाशी यांनी खेळाडूंनचे भरभरून कौतुक करून,हा खेळ भविष्यात नविन उंची गाठेल हा विश्वास प्रकट केला.विनोद तापकीर यांनी भविष्यात खेलो इंडिया सारख्या क्रिडा स्पर्धांनचा क्रिडा संस्था,प्रशिक्षक, पालकांनी फायदा घ्यावा यावर भर दिले.
पत्रकारितेच्या माध्यमातून खेळाडूंनवर,प्रशिक्षकांनवर,संस्थावर,संघटनांवर होणारे अन्याय व खेळात सर्वांगिण विकासाच्या मार्गदर्शनासाठी वृत्तपत्रे व प्रसारमाध्यमांनी पुढाकार घ्यावा असे विचार अकादमीचे प्रशिक्षक हर्षद कुलकर्णी यांनी मांडला.सिद्ध मारे,गितीका चौधरी,राही फूलतांबकर,ईश्वरी कंठागळे,धानी पटेल,सानवी पाटील, अनवी पाटील, परीजा क्षीरसागर व वृंदा सुतार हे खेळाडू स्पर्धेत भाग घेणार आहेत.
नुकतीच हर्षद कुलकर्णी यांची आंतरराष्ट्रीय प्रशिक्षक प्रशिक्षण वर्गासाठी निवड झाली असुन २५ ते २९ उलानबतर, मंगोलिया येथे जाणार आहेत,या निमित्ताने प्रमुख पाहुण्यांच्या हस्ते हर्षद कुलकर्णी यांचा देखील सत्कार करण्यात आला.कार्यक्रमाचे नियोजन प्रमुख प्रशिक्षक अलका तापकीर व चैतन्य कुलकर्णी व खेळाडूंनी केले होते.पालकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून सर्व खेळाडूंनचे प्रोत्साहन वाढवले.












