पुणे | प्रतिनिधी
पुणे, दि. ०८ : पुणे बार असोसिएशनचे ॲड. राजेंद्र उमाप यांची मुंबई उच्च न्यायालयाच्या तक्रार निवारण समिती कार्यकारणीच्या सदस्य पदी नियुक्ती करण्यात आली आहे.
त्यांनी आतापर्यंत पुणे बार असोसिएशनचे माजी अध्यक्ष, महाराष्ट्र व गोवा राज्य बार असोसिएशनचे उपाध्यक्ष, श्री क्षेत्र आळंदी देवस्थान समितीचे विश्वस्त पद भूषविले आहे. त्यांना त्यांच्या पुढील वाटचालीसाठी हार्दिक शुभेच्छा.












