पुणे : शासनाच्या महापीडीएस संकेतस्थळावर तांत्रिक अडचण निर्माण झाल्याने गत काही दिवसांपासून रेशन कार्ड दुरूस्ती, नाव जोडणी, नाव शिधापत्रिका दुरुस्ती कामकाज ऑनलाईन व ऑफलाईन चालू ठेवणे. जिल्ह्यासह संपूर्ण राज्यभरात सदर तांत्रिक अडचण निर्माण झाल्याने शिधापत्रिकाधारकांसह सर्वसामान्य नागरिकांना मात्र त्रास सहन करावा लागत आहे. या तांत्रिक खोड्यामुळे धान्य वाटपावर सुद्धा परिणाम होत असल्याची माहिती आहे.
पिंपरी विधानसभा क्षेत्रातील स्वस्त धान्य दुकान चालक मालक यांनी त्यांना भेडसावणाऱ्या अडचणी बाबत आमदार श्री. अण्णा बनसोडे साहेब यांच्या मार्गदर्शना खाली पुण्याचे पालकमंत्री व राज्याचे उपमुख्यमंत्री तथा अर्थमंत्री आदरणीय अजित दादा पवार व अन्न व नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ साहेब यांची स्वस्त धान्य दुकान चालक मालक यांच्या शिष्टमंडळा सोबत भेट घेऊन ह्या अडचणी दूर करण्याबाबत विनंती केली.
केलेल्या सूचनांवर सकारात्मक तोडगा काढून लवकरच याबाबत आदेश निर्गमित केले जातील अशी माहिती यावेळी दोन्ही मंत्र्यांनी केली. शिष्टमंडळात श्री. नरेश अग्रवाल, श्री गणेश कांबळे, श्री. अजय ढकोलिया, श्री विष्णु चंचलानी यांचा समावेश होता.












