जम्मू-काश्मीर आणि लडाखमध्ये भूकंपाचे धक्के जाणवले. भारतामधील लडाखमध्ये आज पहाटेच्या सुमारास भूकंपाचे धक्के जाणवले. कारगिलमध्ये पहाटे ३ वाजून ३७ मिनिटांनी भूकंप झाला. त्याची तिव्रता ३ रिस्टर स्केअल इतकी होती. यामध्ये कोणतीही जिवीतहानी झालेली नाही.
जम्मू-काश्मीरच्या किश्तवाडमध्ये दुपारी ४.०१ वाजता भूकंपाचे धक्के जाणवले. त्याची तीव्रता रिश्टर स्केलवर ४.८ मोजली गेली. त्यानंतर दुपारी ४:१८ वाजता किश्तवाडमध्ये आणखी एक भूकंप झाला. त्याची तीव्रता ३.६ होती. याआधी, सकाळी ११:३८ वाजता पाकिस्तानमध्ये ४.० तीव्रतेचा भूकंप झाला होता. सतत भूकंपाच्या धक्क्यांमुळे खोऱ्यातील लोक भयभीत झाले आहेत.
भारतासह चीन, अफगाणिस्तान, म्यानमार देशांमध्ये भूकंपाचे धक्के जाणवल्याने या भूकंपाचा आफ्टर शॉक पुन्हा जाणवू शकतात अशी शक्यता व्यक्त केली जात आहे. अनेक देशांमध्ये काही तासांच्या अंतरात भूकंपाचे धक्के जाणवल्याने ही मोठ्या संकटाची चाहूल तर नाही ना अशीची चर्चा आहे.












