मनपा परिसरात लोहगाव बस स्टॉप जवळ सकाळी साडेआठच्या सुमारास ही चोरीची घटना घडली. फिर्यादी हे लोहगाव बस स्टॉप जवळ आपल्या कॅमेरामन सोबत होते. त्या ठिकाणी फिर्यादी शूटिंग करत होते. एका अज्ञात इसमाने फिर्यादींना आवाज देऊन दुसऱ्या अज्ञात इसमाने कॅमेरावर हात मारला. यावेळेस त्यांचा मोबाईल खाली पडला.फिर्यादी हे तेथून निघून गेले. फिर्यादींना काही वेळानंतर लक्षात आले असता ते घटनास्थळी पोहोचले. पण तेथे त्यांना त्यांचा मोबाईल मिळाला नाही. त्या क्षणी फिर्यादींनी कंट्रोल रूमला फोन केला आणि ही माहिती कळवली.
याप्रकरणी शिवाजी पोलीस स्टेशन पुणे येथे भादविक 393 323 आणि 34 अंतर्गत अज्ञात इसमाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला. याप्रकरणी पोलीस उपनिरीक्षक पी.बी. साबळे तपास करत आहेत
मोबाईल चोरून चोर पसार (Crime in pune)












