चोरीच्या घटना या दैनंदिन वाढताना दिसत आहेत. चोर हा नेहमीच अज्ञात असतो असे नाही. बरेचदा चोर घरतलाच असल्याच्या घटना देखील घडत असतात. अशीच एक घटना शनिवारी ३ जून रोजी सकाळी साडे दहा वाजतेच्या सुमारास फिर्यादींच्या कोंढवा बुद्रुक येथील राहत्या घरी चोरीची घटना घडली आहे.
फिर्यादी यांच्या मुलीनेच नजर चुकून चोरी केल्याचे निदर्शनास आले आहे. मुलीने नजर चुकीने बेडरूमच्या लॉकर मधले 15 लाख रुपयांची रोख तसेच 14 लाख 26 हजार रुपयांचे सोन्या-चांदीचे दागिने असा एकूण 29 लाख 26 हजार रुपयांचा ऐवज चोरी करून पलायन केले आहे. चोरीचे करून अद्याप स्पष्ट झालेले नाही.
याप्रकरणी कोंढवा पोलीस ठाण्यात भादंवि कलम 380 अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक स्वप्निल पाटील करत आहेत.












