पुणे | प्रतिनिधी
पुणे, दि. 30 : वाकड येथील आयआयईबीएम संस्था संचलित इंडस बिझनेस स्कूलच्या वतीने आयोजित करण्यात आलेला “पराक्रम” वार्षिक क्रीडा महोत्सव उत्साहात संपन्न झाला. यामध्ये क्रिकेट, खो- खो ,कब्बडी ,बॅडमिंटन , हॉलीबॉल टेबल,टेनिस ,चेस ,कॅरम, मैदानी व इतर २३ खेळांचा समावेश होता.त्याचे वार्षिक पारितोषिक वितरण आज संपन्न झाले.
यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून राष्ट्रीय व्हीलचेअर बास्केट बॉल विजेते अनिल कुमार कच्छी आणि रायफलमॅन नीर बहादर गुरुंग यांच्या हस्ते विजेत्यांना प्रशस्तीपत्रक ,पदक ,स्मृतिचिन्ह देवून सन्मानित करण्यात आले.
यावेळी बोलताना नीर बहादर गुरुंग म्हणाले कि, जीवनात यशस्वी होण्यासाठी सतत कार्यरत राहणे गरजेचे आहे, तसेच तुम्हाला तुमचे उद्दिष्ट साध्य करायचे असेल तर सातत्य ठेवल्यास तुम्हाला कोणी रोखू शकणार नाही, तसेच खेळात हार जीत हि होतच असते. जिंकण्यासाठी स्पर्धेत सहभागी होवू नका तर अनुभव घेण्यासाठी स्पर्धेत सहभागी झाले पाहिजेत.
यावेळी आयआयईबीएमचे अध्यक्ष कर्नल विनोद मारवाह , व्यवस्थापकीय संचालक डॉ.जयसिंग मारवाह,अधिष्ठाता डॉ. पूनम निकम, सह अधिष्ठाता डॉ विशाल भोळे, क्रीडा समिती प्रमुख प्रा.विशाल देसाई , प्रा. सदानंद पेटकर, डॉ. पूनमकुमार हिंगे. संदीप कणसे सर्व शिक्षक आणि शिक्षिकेतर कर्मचारी यांनी क्रीडा स्पर्धा यशस्वी होण्यासाठी विशेष परिश्रम घेतले.












