भारत आणि अफगाणिस्तान यांच्यात तीन टी-20 सामन्याची मालिका आहे. संघाच्या घोषणाकडे सगळ्यांचे लक्ष लागले होते. 11 जानेवारीपासून सुरुवात होणार आहे. या मालिकेसाठी भारतीय संघाची घोषणा करण्यात आली आहे. रोहित शर्मा अफगाणिस्तानविरुद्धच्या टी-20 मालिकेत टीम इंडियाचे नेतृत्व करताना दिसणार आहे. तसेच विराट कोहलीही संघाचा भाग असणार आहे.
टीम इंडियाचा कर्णधार रोहित शर्मा आणि अनुभवी फलंदाज विराट कोहली यांनी टी-20 वर्ल्ड कप 2022 च्या उपांत्य फेरीत खेळल्यानंतर आतापर्यंत संघासाठी एकही टी-20 आंतरराष्ट्रीय सामना खेळलेला नाही. पण आता हे दोन्ही खेळाडू टी-20 संघात परतले आहेत. त्याचबरोबर शिवम दुबे, संजू सॅमसन आणि अक्षर पटेल यांचे टी-20 संघात पुनरागमन झाले आहे.
भारतीय संघ :
रोहित शर्मा (कर्णधार), गिल, जैस्वाल, विराट कोहली, तिलक वर्मा, रिंकू सिंग, जितेश शर्मा (यष्टीरक्षक), संजू सॅमसन (यष्टीरक्षक), शिवम दुबे, सुंदर, अक्षर पटेल, रवी बिश्नोई, कुलदीप यादव, अर्शदीप सिंग, आवेश खान, मुकेश कुमार












