पुणे : आगामी लोकसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर सगळ्या पक्षांनी कंबर कसली आहे. यातच मनसे पुणे लोकसभा लढविण्यासाठी सज्ज झाली आहे. मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी पुण्यात बैठका घेतल्या लोकसभेसाठी मनसे मैदानात उतरणार त्याआधीच मनसेला पुण्यात मोठ खिंडार पडल.
मनसेचे पदाधिकारी असलेल्या मंदार बलकवडे यांनी भाजपमध्ये प्रवेश केला. (शनिवारी) भाजपच्या सुपर वॉरियर्स बैठकीमध्ये चंद्रशेखर बावनकुळे यांच्या उपस्थितीत हा पक्षप्रवेश पार पडला. त्यामुळे आगामी निवडणुकीच्या दृष्टीकोनातून मनसेला पुण्यात मोठा धक्का बसला आहे.
भाजप नेत्यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि माझ्यावर मोठ्या नेत्यांचे पक्ष प्रवेश करून घेण्याची जबाबदारी टाकली असे माध्यमांशी बोलतांना बावनकुळे यांनी सांगितले आहे. जानेवारी महिना पक्ष प्रवेशासाठी दिला आहे. येत्या काळात मोठे भूकंप होणार आहेत, असा दावा भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी केला.












