पुणे : लोकसभा निवडणुकांसाठी महाविकास आघाडीच्या राज्य व केंद्रात बैठका सुरू असताना. पुणे लोकसभेसाठी मविआमध्ये अनेक जण इच्छुक आहे. पुणे हा काँग्रेसचा पारंपरिक मतदार संघ आहे. याच मतदार सांघावरून महा विकासह आघडीत बिघाडी होण्याची शक्यता आहे. आता काँग्रेसने आपली हालचाल सुरु केली आहे. पुणे लोकसभेसाठी इच्छुक उमेदवारांचे अर्ज मागवले आहे.
कॉंग्रेस पक्षाचे शहराध्यक्ष अरविंद शिंदे यांनी याबाबतचे रविवारी पत्रक काढले. महाराष्ट्र प्रदेश कॉंग्रेस कमिटीच्या आदेशानुसार, पुणे शहर जिल्हा कॉंग्रेस कमिटीने पुणे लोकसभा मतदारसंघासाठी इच्छुक उमेदवारांकडून अर्ज सादर करण्याची प्रक्रिया सुरू केल्याचे स्पष्ट केले.
लोकसभा निवडणूक लढविण्यासाठी इच्छुक असणाऱ्या उमेदवारांना संपूर्ण माहितीसह आपले अर्ज मंगळवारपर्यंत सकाळी अकरा ते सायंकाळी पाच या वेळेत सादर करावे लागणार असल्याचे शिंदे यांनी पत्रकामध्ये नमूद केले आहे. अर्ज प्रक्रिया सुरू करून कॉंग्रेसने निवडणुकीसाठीची तयारी सुरू केल्याची चिन्हे आहेत.












