पिंपरी(प्रतिनिधी) चिंचवड येथील महात्मा जोतिबा फुले मंडळाच्या वतीने दरवर्षी शहरामध्ये उल्लेखनिय कार्य करणाऱ्या महिलाना क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले पुरस्काराने सन्मानित करण्यात येते. सन २०२४ या वर्षीच्या पुरस्कारासाठी खालील महिलांची निवड करण्यात
आली आहे. सदर पुरस्कार सोहळा मंगळवार दिनांक ०९/०१/२०२४ रोजी सायंकाळी ५ वा. रामकृष्ण मोरे प्रेक्षागृह, चिंचवड येथे संपन्न होणार आहे. सदर पुरस्कार सोहळा खासदार श्रीरंग आप्पा बारणे, महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपालीताई चाकणकर, राज्य पो. महानिरीक्षक सुनिल फुलारी, आमदार अश्विनीताई जगताप,आमदार उमाताई खापरे आदि मान्यवरांच्या उपस्थित राहणार आहे. अशी माहिती अध्यक्ष हनुमंत माळी यांनी प्रसिद्धी पत्रकाद्वारे दिली.
क्रांतिज्योति सावित्रीबाई फुले यांनी सुरू केलेल्या भारतातील पहिल्या मुलींच्या शाळेचे राष्ट्रीय स्मारक
व्हावे यासाठी १३ वर्षे न्यायालयीन लढा देऊन भिडे वाड्याचे राष्ट्रीय स्मारक करण्याचा मार्ग सुकर करणाऱ्या पुणे मनपाच्या विधी विभागाच्या प्रमुख अॅड. निशा चव्हाण, मनपा उपायुक्त प्रतिभा पाटील व श्वेता दारुणकर यांना मंडळाच्या वतीने यावर्षी क्रांतिज्योति सावित्रीबाई फुले पुरस्काराने गौरविण्यात येणार आहे.
*क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले पुरस्कारार्थी – २०२४
अॅड. निशा चव्हाण (कायदा भूषण पुरस्कार), प्रतिभा पाटील(कर्तव्य भूषण),
मालन भुजबळ (आदर्श माता),
रंजना गायकवाड (आदर्श माता),
नाझिया जाकीर हुसेन मुलाणी (फातिमा सावित्री पुरस्कार),डॉ. अर्चना क्षिरसागर – (रखमाबाई राऊत सावित्री वैद्यकीय भूषण),
ज्योती तापकीर – (आदर्श मुख्याध्यापिका),
शुभांगी तरस (शिक्षण भूषण),अनिता दुधाळ / राऊत – (आदर्श शिक्षिका), अश्विनी तळेले (आदर्श शिक्षिका),
शशिकला ओव्हाळ,ज्योती कळमकर,
सोनम जांभूळकर,रुपाली आल्हाट,
सपना माळी,आदिती निकम,गौरी धुमाळ,
भारती पाटील ( सर्व समाज भूषण),
अश्विनी पवार (पत्रकार भूषण),सायली केदार काणे – (कला भूषण),मोनिका तायडे – कला भूषण
वैशाली देशमाने (योग भूषण)












