पुणे : आज पुण्यातील श्रीमती काशीबाई नवले ऑफ इंजिनिअरिंग कॉलेज मध्ये सारथी, बार्टी, महाज्योती CET परीक्षा पुन्हा पेपर फुटल्याचे निदर्शनास आले. त्यानंतर विद्यार्थी आक्रमक झाले त्यांना शांत करण्यासाठी आधी त्यांना कोंडून ठेवले त्यानंतर अजून एक बातमी समोर येत आहे. या ठिकाणी पुन्हा एकदा पेपर फुटलेला आहे. याचाच जाप विचारण्यासाठी विद्यार्थी आले होते मात्र सुरक्षारक्षकांबरोबर विद्यार्थ्यांची बाचाबाची झाली.
पण या ठिकाणी सुरक्षा रक्षकांनी दादागिरी करत विद्यार्थ्यांना मारहाण केली व विद्यार्थिनींना छेडछाड केली व विद्यार्थ्यांना धक्काबुक्की करत त्यांना तेथून परत जाण्यासाठी सांगितले विध्यार्थ्यानी नकार दिला जाप विचारणे आमचा अधिकार आहे आम्हाला पेपर फुटीचा जाप विचारायचा आहे. त्यावेळेस सुरक्षारक्षकांनी विध्यार्थी व विद्यार्थिनीना मारा हान केली. त्यानंतर विद्यार्थ्यांनी सुरक्षारक्षकांची तक्रार त्यांच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांकडे केली व सुरक्षारक्षकांना निलंबित करण्याची मागणी केली आहे.












