छत्रपती संभाजीराजे यांचे निकटवर्तीय संजय पवार यांची स्वराज्य पक्षाच्या कोल्हापूर जिल्हाप्रमुख पदी नियुक्ती करण्यात आली. स्वतः छत्रपती संभाजीराजे यांनी ही नियुक्ती केली असून कोल्हापूर लोकसभा निवडणुकीच्या दृष्टीने ही निवड महत्त्वाची ठरणार आहे.
कोल्हापूर लोकसभेकरिता छत्रपती संभाजीराजे यांचे नाव चर्चेत असून नुकताच जिल्ह्यातील संभाजीराजे गटाचा भव्य मेळावा कोल्हापूरात पार पडला. या मेळाव्यात संभाजीराजे यांनी लोकसभेच्या आखाड्यात उतरावे, यासाठी सर्व कार्यकर्त्यांनी आग्रह केला होता. या संपूर्ण मेळाव्याचे नियोजन देखील संजय पवार यांनीच केले होते.
या पार्श्वभूमीवर संजय पवार यांची स्वराज्य पक्षाच्या जिल्हाप्रमुख पदी केलेली नियुक्ती ही संभाजीराजे यांच्या लोकसभा तयारीची नांदीच आहे, असे स्पष्ट दिसत आहे.छत्रपती संभाजीराजे जर कोल्हापूर मधून लोकसभेसाठी उभे राहिले तर याचा फटका कोणत्या पक्षाला बसेल राजेंनी भाजप सोडले आणि महाविकासआघाडी मधून राज्यसभा खासदार होण्याची इच्छा जाहीर केली. पण शिवसेनेने त्यांना पक्षात प्रवेश करण्याची अट ठेवली त्यानंतर त्यांनाही त्याचा विरोध केला आणि नंतर राज्यसभा खासदारकीचा अर्ज मागे घेतला. यामुळे संभाजी राजे कोल्हापूर मधून कोणाला फटका देताय त्याकडे आता सर्वांचे लक्ष लागले आहे.












