बुलढाणा:स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे जिल्हाध्यक्ष ज्ञानेश्वर टाले यांच्यासह सात जणांच्या विरोधात गुन्हा दाखल झाल्याची माहिती समोर येत आहे. जागेच्या जुन्या वादातून दोन गटात हाणामारी झाल्याची प्राथमिक माहिती आहे.
मेहकर तालुक्यातील डोनगाव येथे जागेच्या जुन्या वादातून दोन गटात तुफान राडा झाल्याची माहिती पोलिसांनी दिली. या घटनेत चार ते पाच जण जखमी झाले आहेत. या घटनेत कोयत्याने हल्ला करण्यात आल्याची प्राथमिक आहे. या घटनेचा व्हिडिओ व्हायरल झाला आहे.
जखमींवर खाजगी रुग्णालयात उपचार सुरु आहे. याप्रकरणी डोनगाव पोलिस ठाण्यात स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे जिल्हाध्यक्ष ज्ञानेश्वर टाले,देवेंद्र आखाडे, वैभव आखाडे यांच्यासह पाच जणांवर गंभीर स्वरूपाचे गुन्हे दाखल करण्यात आले












