पुणे प्रतिनिधी
पुणे दि.२५ : गेल्या दोन महिन्यांपासून मणिपूर जातीय दंगलींमुळे जळत आहे. मणिपूर मध्ये काही लोकांनी दोन महिलांची नग्न अस्वस्थेत धिंड काढल्याचा व्हिडीओ समाज माध्यमांवर व्हायरल झाला होता. या घटनेचा संपूर्ण देशात निषेद व्यक्त केला जात आहे. पिंपरी-चिंचवड ॲडव्होकेट्स बार असोसिएशनकडून देखील या घटनेचा निषेध करण्यात आला आहे.
पिंपरी चिंचवड ॲडव्होकेट्स बार असोसिएशनच्या उपाध्यक्ष ॲड. जयश्री कुटे, पिंपरी चिंचवड ॲडव्होकेट बार असोशिएशनचे माजी अध्यक्ष ॲड. सुशील मंचरकर, ॲड. सुजाता बिडकर , ॲड. संगीता परब, ॲड. पूनम राऊत यांनी निषेध व्यक्त केला.
यावेळी ॲड. उमेश खंदारे, ॲड. गजेंद्र तायडे, ॲड. मेरी रणपिसे, ॲड. धनंजय कोकणे, ॲड. साठे, सचिव ॲड. गणेश शिंदे, ऑडिटर ॲड. राजेश रणपिसे, सदस्य ॲड. सौरभ जगताप, ॲड. प्रशांत बचुटे, आजी माजी पदाधिकारी व वकील उपस्थित होते.
मणिपूर घटनेचा वकीलांमध्ये ही संताप : पिंपरी चिंचवड बार असोसिएशन चा निषेध मोर्चा












