
पिंपरी(प्रतिनिधी)
देशाला वाचविणाऱ्यापेक्षा देश विकणार्यांची संख्या अधिक आहे. शहीद जवान हे आपल्या देशाचे खरे हीरो आहे,आज त्याच खऱ्या हिरोंचे विस्मरण देशाला होत आहे. ५५९ कारगिल युद्धातील जवानांचे नाव कुणालाही माहिती नसेल.अशी खंत कारगील युध्दा ४० आतंकवाद्यांचा खात्मा करणारे परमवीरचक्र विजेते सुभेदार(नि) दिगेंद्र कुमार यांनी व्यक्त केली.
रोटरी क्लब निगडी, रोटरी क्लब पिंपरी,रोटरी क्लब प्राधिकरण,रोटरी क्लब उद्योगनगरी,रोटरी क्लब आकुर्डी ,रोटरी क्लब बेलमॉल्ड यांच्या संयुक्त विद्यमाने कारगील दिनाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी ते बोलत होते.
यावेळी प्रांतपाल मंजू फडके,प्रांतीय सांस्कृतिक समिती प्रमुख वसंत मालुंजकर,निगडी क्लबचे अध्यक्ष हरबिंदर सिंग,सचिव शशांक फडके, रोटरी क्लब पिंपरीचे अध्यक्ष डॉ मनिष फरांदे,रोटरी क्लब प्राधिकरण चे अध्यक्ष रजनी द्विवेदी,रोटरी क्लब उद्योगनगरीचे अध्यक्ष विवेक येवले,रोटरी क्लब आकुर्डीचे अध्यक्ष शशिकांत शर्मा ,रोटरी क्लब बेलमोंडो क्लबचे अध्यक्ष मनोज सोलंकी आदी मान्यवर उपस्थित होते.
यावेळी दिगेंद्र कुमार यांना क्लबकडून विशेष मानपत्र,पुणेरी पगडी देवून सन्मान केला.
दिगेंद्र कुमार पुढे म्हणाले कि, कुत्रे,मांजर, हत्ती, घोडे अशा देशात प्राण्यांपासून देखील कर मिळतो तरी देशाची प्रगती होत नाही.
यापूर्वी देखील सर्जिकल स्ट्राईक होत, असे मात्र त्याबद्दल कमालीची गुप्तता बाळगली जायची. आमच्या पत्नीला देखील माहिती होत नव्हते.
देश बहादूर आहे, मात्र महर्षि दयानंद ऋषी यांच्या सारखे देशाला जागवणारा पाहिजेत.
माझे नशीब थोर आहे कि महावीरचक्र पदक पाहण्यासाठी मी जीवंत आहे. हे पदक मिळवणारे बरेच जवान शहीद झालेले आहे.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन आरती मुळे तर आभार संतोष केंद्रे यांनी मानले. शुभांगी कोठारी यांनी मानपत्राचे वाचन केले.












