पुणे | प्रतिनिधी
पुणे, दि. १५ : अनेक विद्यार्थी संघटनांनी पुणे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलन सुरू केले आहे. या आंदोलनास आम आदमी पार्टी पुणे कडून जाहीर पाठिंबा देण्यात आला. ६ सप्टेंबर रोजी राज्य शासनाने घेतलेल्या निर्णयानुसार, शासकीय विभागातील अनेक पदांवर कंत्राटी पद्धतीने नोकर भरती करण्याचे ठरविले आहे.
आधीच महाराष्ट्रातील तरुणांना नोकऱ्या नाहीत, त्यात राज्य सरकार असे निर्णय घेऊन परीक्षांची तयारी करत असणाऱ्या विद्यार्थ्यांच्या मेहनतीवर पाणी फिरवत आहे. अंदाजे ७५ हजार सरकारी जागांवर कंत्राटी पद्धतीने नोकर भरती होणार आहे. सरकारच्या आणि नियुक्ती करण्यासाठी निवडलेल्या संस्थांच्या जवळच्या लोकांनाच या नोकऱ्या मिळतील मग इतर युवकांनी कुठे जायचे, ते करत असलेल्या जीवापाड मेहानीची जबाबदारी कोण घेणार ? म्हणून शासनाने त्वरित आदेश मागे घेणे गरजेचे आहे.
आंदोलन करत असलेल्या विद्यार्थ्यांना पाठींबा देण्यासाठी स्वतः आम आदमी पार्टी चे पुणे शहर अध्यक्ष श्री. सुदर्शन जगदाळे आणि खूप मोठ्या प्रमाणात कार्यकर्ते त्या ठिकाणी हजर होते. त्यांनी विद्यार्थांना आम आदमी पार्टी चा जाहीर पाठींबा दिला आणि सर्व मदतीचे आश्वासन दिले. महाराष्ट्रात पेपर लीक होत आहेत सगळीकडे भ्रष्टाचार फोफावला आहे, म्हणून जनतेने व्यवस्था परिवर्तन करण्यासाठीं आम आदमी पार्टी च्या उमेदवारांना निवडून देणे गरजेचे आहे आहवान केले व पार्टी सर्व स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका लढविणार आहे असे जाहीर केले.
या शासन निर्णयाचा विरोध म्हणून काल १४ सप्टेंबर रोजी आम आदमी पार्टी पुणे कडून सह्यांची मोहीम सुरू केली आहे आणि त्यास उदंड प्रतिसाद मिळाला आहे. या आंदोलनास पाठिंबा देताना प्रमूख उपस्थितीतांमध्ये आप चे पुणे शहर अध्यक्ष सुदर्शन जगदाळे, अमित म्हस्के, मुकुंद किर्दत, कनिष्क जाधव, सतीश यादव, मनोज शेट्टी, ॲड. अमोल काळे, किरण कांबळे, मिलिंद ओव्हाळ व सहकारी उपस्थित होते.












