पुणे, दि. ०३ : भारती विद्यापीठ पोलीस स्टेशन आणि भारती विद्यापीठ कॉलेज ऑफ फाईन आर्टस् यांच्या संयुक्त विद्यमाने विधीसंघर्षीत बालकांच्या भवितव्यासाठी कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले होते.
पुर्ण शहरामध्ये बालकांकडुन गंभीर स्वरुपाचे गुन्हे वारंवार घडत असल्यामुळे त्यांचे समुपदेशन करुन समाजामधील चांगल्या प्रवाहामध्ये आणून घडविण्यासाठी दि. ३१ रोजी भारती विद्यापीठ कला महाविद्यालयाच्या शिल्प विभागात बालकांच्या भवितव्यासाठी Enlighting the Future An Art Workshop for juvenile या कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले होते.
या कार्यशाळेमध्ये बालकांना कलेच्या शिक्षण क्षेत्रातील असलेले फायदे, संधी, तसेच बालकांनी गुन्हेगारीपासुन दुर रहावे, त्यांनी समाजात चांगले नाव कमवावे याकरता एखादा व्यवसाय अथवा कला शिकुन त्यांनी चांगले नागरीक व्हावे यादृष्टीने त्यांना पणती रंगवून त्यावरती डिझाईन रंगवण्याचे प्रात्यक्षिक दाखवुन पणत्या तयार करवून घेतल्या आहेत.
त्या पणत्या दिवाळी सणामध्ये भारती विद्यापीठ पोलीस स्टेशन येथे प्रदर्शन स्वरुपात ठेवून त्यांची विक्री केली जाणार आहे. या उपक्रमामधुन विधीसंघषीत बालकांना व्यसन, गुन्हेगारी पासून परावृत्त करुन, त्यांना स्वयंरोजगारातुन अर्थिक स्वावलंबी बनवुन त्यांनी आई-वडीलांना हातभार लावून चांगले नागरीक बनावे हा उद्देश आहे. या उपक्रमास एकुण ४५ विधीसंघर्षीत बालकांनी हजर राहुन कार्यशाळा यशस्वी केली आहे.
या कार्यशाळेदरम्यान बालकांना मा. पोलीस उप-आयुक्त परिमंडळ-२, श्रीमती स्मार्तना पाटील, वरीष्ठ पोलीस निरीक्षक, श्री. विनायक गायकवाड, पोलीस निरीक्षक (गुन्हे), श्री विजय पुराणिक, श्री गिरीश दिघावकर, सहा पोलीस निरीक्षक, अमोल रसाळ, पोलीस उप-निरीक्षक धिरज गुप्ता यांनी तसेच भारती विद्यापीठ कॉलेज ऑफ फाईन आर्टस कॉलेजचे प्राचार्य डॉ अनुपमा पाटील यांनी समुपदेशन केले आहे.
हा उपक्रम मा पोलीस आयुक्त, पुणे शहर. श्री. रितेश कुमार, मा. पोलीस सह आयुक्त. पुर्ण शहर, श्री. संदीप कर्णिक, मा. अपर पोलीस आयुक्त, पश्चिम प्रादेशीक विभाग, पुणे, श्री प्रविणकुमार पाटील, मा.पोलीस उप-आयुक्त परिमंडळ-२. श्रीमती स्मार्तना पाटील मा. सहाय्यक पोलीस आयुक्त, स्वारगेट विभाग, पुणे, श्री नारायण शिरमानकर, वरीष्ठ पोलीस निरीक्षक, श्री. विनायक गायकवाड व भारती विद्यापीठ परिवाराचे अध्यक्ष मा.बाना शिंदे, भारती विद्यापीठ कॉलेज ऑफ फाईन आर्टस कॉलेजचे प्राचार्य, डॉ अनुपमा पाटील यांचे मार्गदर्शनाखाली घेण्यात आला आहे.












