आरोपीकडुन १ लाख रुपयांचा १० किलो १५० ग्रॅम गांजा जप्त
वाकड पोलीस स्टेशन तपास पथकाची कामगिरी
पोलीस आयुक्त श्री.विनयकुमार चौबे यांनी पिंपरी चिंचवड शहरातील अंमली पदार्थ विक्री व वाहतुक करणाऱ्या धंदयांवर कारवाई करण्याबाबत आदेश दिले आहेत. त्या अनुषंगाने श्री . गणेश जवादवाड , वरिष्ठ पोलीस निरीक्षक वाकड पोलीस ठाणे यांनी तपास पथकातील सपोनि संतोष पाटील , पोउपनि सचिन चव्हाण तपास पथक अंमलदार यांना अंमली पदार्थाबाबत कारवाई करण्याचा सूचना दिल्या,
त्याप्रमाणे सपोनि . संतोष पाटील व पोउपनि , सचिन चव्हाण यांची वेगवेगळी पथके तयार केली. सपोनि. संतोष पाटील हे पेट्रोलींग करीत असताना थेरगाव फाटा ते रहाटणी लिंक रोडवर एक व्यक्ती पोते घेवून संशयांतरित्या उभा असलेला दिसला त्याच्या हालचालीवरून संशय आल्याने शिताफीने घेराव घालून त्यास ताब्यात घेण्यात आले .
त्यास नाव पत्ता विचारला असता त्याने आपले नाव सुशिल साळीकराम मोरे , वय ३४ वर्षे , रा . घिसाराम चौधरी यांचे इमारतीत दुसरा मजला , आनंद मेमोरियल हॉस्पीटल समोर , आनंदवन सोसायटी , थेरगाव , पुणे असे सांगितले. त्याची रितसर झडती घेतली असता त्याच्याकडे १,००,००० / – रुपये किंमतीचा एकुण १० किलो १५० ग्रॅम वजनाचा गांजा मिळून आल्याने त्याबाबत वाकड पोलीस ठाणे गु.र.नं. २०७३/२०२३ . एन . डी . पी . एस . अॅक्ट कलम ८ ( क ) . २० ( अ ) ( ii ) ( ब ) प्रमाणे गुन्हा दाखल केला असून आरोपीस अटक करण्यात आली आहे.
आरोपींची दि .०६ रोजीपर्यंत पोलीस कोठडी रिमांड प्राप्त असून चौकशी चालू आहे. सदर आरोपी कडून जप्त करण्यात आलेला गांजा हा त्याने अशोक तुपेरे रा . वाकड, पुणे याच्याकडून विक्री करिता घेवून आल्याचे तपासात निष्पन्न झाले असून त्याचा तपास चालू आहे .
सदरची कारवाई श्री . विनयकुमार चौबे सो , पोलीस आयुक्त , पिंपरी चिंचवड , श्री.डॉ.संजय शिंदे सह पोलीस आयुक्त , मा.श्री.वसंत परदेशी , अपर पोलीस आयुक्त , श्री .डॉ .काकासाहेब डोळे पोलीस उप आयुक्त परि -२ पिंपरी चिंचवड , श्री . डॉ . विशाल हिरे , सहा . पोलीस आयुक्त , वाकड विभाग , पिंपरी चिंचवड यांच्या मार्गदर्शनाखाली श्री . गणेश जवादवाह वरिष्ठ पोलीस निरीक्षक , श्री. विठ्ठल साळुंखे पोलीस निरीक्षक ( गुन्हे ) सपोनि , संतोष पाटील , पोउपनि . सचिन चव्हाण , सपोफौ , विभीषण कन्हेरकर , सपोफौ बाबाजान इनामदार , सपोफौ राजेंद्र काळे , पोहवा . संदीप गवारी , पोहबा . स्वप्निल खेतले , पोहवा . दिपक साबळे , पोहवा . अतिश जाधव , पोहवा . प्रमोद कदम , पोहवा वंदू गिरे , पोना प्रशांत गिलवीले , पोना अतिक शेख , पोना . विक्रांत चव्हाण , पोना . राम तळपे , पोशि , अजय फल्ले , पोशि भास्कर भारती , पोशि . स्वप्निल लोखंडे , पोशि , सौदागर लामतुरे , पोशि कौतेय खराडे , पोशि . विनायक घारगे पोशि रमेश खेडकर , पोशि , सागर पंडीत ( परि ०२ कार्यालय ) यांनी मिळून केली आहे .












