पुणे, दि. ०९ : नॅशनल स्किल डेव्हलपमेंट कॉर्पोरेशन इंटरनॅशनल संस्थेने कौशल्य विक्स प्रशिक्षण क्षेत्रात अग्रेसर असलेल्या पुण्यातील यशस्वी अकॅडमी फॉर स्किल संस्था व फेमिना फ्लॉन्ट अकॅडमीशी सामंजस्य करार केला आहे.या करारानुसार तरुण-तरुणींना ब्युटी अँड वेलनेस क्षेत्रातील जगभरातील रोजगार संधी एनएसडीसी इंटरनॅशनल मिळवून देणार आहे.
एनएसडीसी इंटरनॅशनलचे सीइओ अजय रैना,एनएसडीसी इंटरनॅशनलचे सल्लागार डॉ.संदीप सिंह कौरा यांच्या प्रमुख उपस्थितीत या सामंजस्य करारावर स्वाक्षरी करण्यात आली.
या करारानुसार आता यशस्वी अकॅडमी फॉर स्किल्सच्या वतीने फेमिना फ्लॉन्ट अकॅडमीमध्ये विविध प्रकारचे ब्युटी टेक्निशियन विषयक कौशल्य प्रशिक्षण घेणाऱ्या विद्यार्थी-विद्यार्थिनींना प्रशिक्षण पूर्ण झाल्यानंतर एनएसडीसी इंटरनॅशनलच्या माध्यमातून थेट परदेशातील नोकरीच्या संधी प्राप्त होणार आहेत.
जगभरात ब्युटी अँड वेलनेस क्षेत्रात जवळपास दहा लाखांहून अधिक नोकऱ्या उपलब्ध असून या संधी भारतीय तरुण – तरुणींना उपलब्ध व्हाव्यात यासाठी एनएसडीसी इंटरनॅशनलने पुढाकार घेतला आहे,असे यावेळी ‘यशस्वी’ संस्थेचे अध्यक्ष विश्वेश कुलकर्णी यांनी सांगितले.
या कराराप्रसंगी फेमिना फ्लॉन्ट अकॅडमीच्या वरिष्ठ पदाधिकारी स्नेहा वासानी व एनएसडीसी इंटरनॅशनलचे उत्तर विभागाचे वरिष्ठ अधिकारी रजत भटनागर यांच्यासह इतर मान्यवर उपस्थित होते.












