पुणे । प्रतिनिधी
पुणे दि.१३ : वाकड(प्रतिनिधी) येथील आय.आय.ई.बी.एम, इंडस बिझिनेस स्कूल, कर्नल विनोद मारवाह फाउंडेशन आणि आर्म फोर्स मेडिकल कॉलेज यांच्या संयुक्त विद्यमानेरक्तदान शिबिर आयोजित करण्यात आले होते.
या शिबिरामध्ये १०२ जणांनी रक्तदान केले. या शिबिराचे उदघाट्न प्रसंगी आय.आय.ई.बी.एमचे संस्थेचे अध्यक्ष कर्नल विनोद मारवाह,व्यवस्थापकीय संचालक डॉ. जयसिंग मारवाह, अधिष्ठाता डॉ. पूनम निकम, सह अधिष्ठाता डॉ. विशाल भोळे, मेजर डॉ. शाहीन, मेजर अनीज अली ,समन्वयक बापू पवार सर्व शिक्षक आणि शिक्षिकेतर कर्मचारी, विद्यार्थी यांच्या उपस्थित होते.
“रक्तदान हेच श्रेष्ठ दान” अपघात व उपचार प्रसंगी गरजू व्यक्तींना रक्त उपलब्ध व्हावे, भारत देशाचे जावान संरक्षण करण्यासाठी नेहमी सतर्क असतात त्यांच्या साठी आपण आपले रक्तदान करणे हि आवशक आहे. व युवकांमध्ये रक्तदान करण्याबाबत जनजागृती व्हावी या उद्देशाने कॉलेजच्या वतीने रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात असल्याची माहिती जय सिंग मारवाह यांनी दिली.
यावेळी रक्तदान करण्यासाठी रक्तदात्या शिक्षक आणि शिक्षिकेतर कर्मचारी, विद्यार्थ्यांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदवला. प्रणव भेगडे, जान्हवी पगारे यांनी शिबीर यशस्वी होण्यासाठी विशेष परिश्रम घेतले.












