मावळ प्रतिनिधी:
यंदा पाऊस उशिरा सुरू झाला असल्यामुळे आणि जेथे पाण्याची सोय नसलेल्या माळरान , पठार , डोंगर पायथा अशा अनेक ठिकाणी उशिरा भातलावणी झाली असल्यामुळे अशा ठिकाणी सध्या भात कापणी सुरू झालेली आहे.
नदीकाठी,तलाव यासारख्या ठिकाणी इलेक्ट्रिक उपकरणांच्या सहाय्याने जेथे पाण्याची सोय आहे अशा ठिकाणी भात कापणी होऊन भात झोडणीची आणि पेंढ्या बांधणीची कामे चालू आहेत. आता पाऊसही उघडला असून जेथे लवकर भात लावणी झाली आहे तेथे भात झोडणी , पेंढ्या बांधणे आणि जेथे उशिरा भात लावणी झालेली आहे तेथे भात कापणीच्या कामात बळीराजा व्यस्त आहे .












